निसर्ग सौंदर्य संपन्न कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियात अभिमान व गर्व करावा अशी पन्नास उद्याने आहेत. त्यांतील बहुतांश नवश्रीमंत लोकांची खाजगी कौटुंबिक मालमत्ता होती. आता ती बहूतेक सर्वासाठी खुली आहेत अल्काट्राझ (rock ) बेटावरील कैदी व तेथील कर्मचाऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या सुंदर बागा, या मुख्यतः येथे तुरुंगाचे अस्तित्व असलेल्या काळातील आहेत. अतिशय कठोर वातावरण, कठीण खडकावर बागांची निर्मिती यात माणसाची निसर्गाशी संलग्न असण्याची गरज व आवड दिसते.फिलोली गार्डन, वॅालनट स्ट्रीटवरचे चार एकराचे छोटेसे कॅकटस व सक्युलंट बॅनक्रोफ्ट गार्डन, मॅलबू मधील -होडा अॅडामसन हाऊस व गार्डन , पॅलो एलटो येथील एलिझाबेथ गॅम्बल गार्डन, ( Elizabeth. F. Gamble Garden ) प्रोक्टर आणि गॅम्बल मधील गॅम्बल कुटुंबातील एलिझाबेथने तयार केलेली बाग, येथील एक भाग ( Roots and Shoots planting) पूर्णतः तिसरीतील मुले वाढवतात व काळजी घेतात. सध्याच्या स्क्रिनला चिकटलेल्या प्रत्येक लहान मुलाला ही संधी मिळाली पाहिजे. या सर्व खाजगी व कौटुंबिक बागा आता , पब्लिक पार्क’, मध्ये त्यांचे रुपांतर झाले आहे.
कॅलिफोर्नियात गोल्डरश नंतर , नवोदित श्रीमंत लोकांना त्यांच्या मालकीच्या सुंदर, नयनरम्य बागा हव्या होत्या. येथील भुमध्यसागरी हवामानही त्यास अनुकूल आहे. येथील विविध शहरांतील वडील व श्रीमंत लोकांना नैसर्गिक सौंदर्य व विविध रंगांनी, फुलांनी नटलेल्या बागांची गरज वाटली या लोकांनी पुढाकार घेऊन, निधी गोळा करून, स्थानिक सरकारच्या मदतीने अशा बागा व उद्यानांची निर्मिती केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे , ‘गोल्डन गेट पार्क.’ पूर्ण वालुकामय असूनही १०१७ एकरावर सुंदर उद्यान उभारण्यात आले त्यात विविध प्रकारच्या बागा व म्युझियम आहेत . या जागतिक दर्जाच्या उद्यानाचा इतिहास, त्याचे संवर्धन, सर्वच विलक्षण व विस्मयकारक आहे. तेथे पर्यवेक्षक म्हणून ५३ वर्ष काम करणाऱ्या john McLaren ची निष्ठा व सेवा सर्वच प्रशंसनीय आहे. अनेक दशके किंवा शतकांपासून या बागांची योग्य निगा राखून काळानुसार संवर्धन व विकास केले गेले. नवीन गोष्टींची त्यात भर पडत गेली. यांत वय्यक्तिक, सेवाभावी संस्थाचेही योगदान आहे.

गोल्डन गेट पार्क
न्ययॅार्क सारख्या शहरात असलेली उद्याने व राष्ट्रीय उद्याने यांच्यात महत्वाचा फरक आहे.
राष्ट्रीय उद्याने ही अतिशय मोठी , विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी दूरवर पसरलेली असतात. त्यांचा मुख्य उद्देश मोठ्या भूप्रदेशाचे वातावरण संरक्षण, नैसर्गिक अधिवास व सौंदर्य जपणे, वन्यजीवन, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळाची जपणूक हा असतो.अशी उद्याने कोविद शासित असतात.
दाट लोकवस्तीच्या शहरांत हिरव्या जागा निर्माण केल्या जातात. तेथे करमणूकीची सोय, उत्सव साजरे करणे ,खेळ, ऱ्स्वच्छ हवा पाणी व मोकळे वातावरण असते. ही उद्याने वृक्ष, फुले वेलीनी नटलेली असतात. याची देखभाल तेथील स्थानिक सरकार करते.
न्युयॅार्कला जे सेन्ट्रल पार्कचे महत्व आहे तेच कॅलिफोर्नियाच्या गोल्डन गेट पार्कला आहे. हा पार्क सेंन्ट्रल पार्कपेक्षा जास्त मोठा आहे व समुद्राला लागून आहे. या पार्कची गणना जगातील मोठ्या प्रसिद्ध पार्कमध्ये होऊ शकते. या पार्कच्या प्रत्येक वळणावर विस्मयकारक जागा व गोष्टी आहेत. येथे दोन मोठे म्युझीयम, राष्ट्रीय AID चे स्मारक, गव्याचा कळप, समुद्रालगत चौपाटी, व्हिक्टोरियन ग्लास हाऊस, लेक्स्, व सॅनफ्रॅन्सिसको बोटॅनिकल गार्डनचीही यांत समावेश होतो.
१८५० मधील गोल्डरशने सॅनफ्रॅन्सिसको येथे हजारोंच्या संख्येने लोक येथे आले व प्रचंड संपत्तीची निर्मिती झाली. शहरांतील वडील लोकांना त्यांच्या वैभवाचे प्रतीक व त्यांच्या सतत विकासाला चालना देण्यासाठी एक मोठे उद्यान आवश्यक वाटत होते. १८७० मध्ये १८ वर्षे बोलणी केल्यावर स्थानिक नेते येथील सरकारकडून १०१७ एकर जमीन मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांनी भुरचनेचा अभ्यासकरण्यासाठी (सर्वेक्षण ) एका सर्वेक्षकाची नेमणूक केली. पण त्यांची मुख्य समस्या होती की ही उद्यानाची जागा म्हणजे वाळू व वाळूचे ढीगारे या शिवाय दुसरे काहीही नव्हते ‘ सेन्ट्रलपार्क’ चा डिझाईनर फ्रेड्रिक ओल्मस्टेड याला त्या जागेविषयी मत विचारले असता त्याने ती जागा अशक्य म्हणून नाकारली.
विल्यम हॅामंड हॅालला जेव्हा सर्वेक्षक म्हणून नेमण्यांत आले तेव्हा तो फक्त २५ वर्षांचा होता. तो स्थापत्य अभियंता ( सिव्हिल इंजिनिअर ) होता. त्याला बागायती कामाचे शास्त्र व परिसर सुशोभीकरण यांची फारशी माहिती नव्हती. तो लौकरच पारंगत झाला व त्याला गोल्डन गेट पार्कचा पहिला पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. न्युयॅार्क मधील सेंट्रलपार्क हे देशात एकमेव उद्यान या आकाराचे व पद्धतीचे होते. हॅालने ॲाल्मस्टेड पासून कल्पना व प्रेरणा घेऊन आकर्षक पद्धत, वळणावळणांचे रस्ते,पदपथ व नैसर्गिक गोष्टींचा समावेश केला. त्यावेळी पर्यावरणशास्त्राची कल्पनाही अस्तित्वात नव्हती. हॅालला अतिसूक्ष्म हवामान व तेथील वनस्पतींचे महत्त्व माहीत होते. उद्यानाच्या वालुकामय मातीत व त्याच्या आसपासच्या आठ तलावाभोवती ( आता पाच) असलेल्या खुज्या ओकचे वृक्ष ( scrub Oaks ),खुजे लुपीन्न्स ( Scrub lupine) व जंगली विलो उपटण्याची कोणालाही परवानगी नव्हती.
१८७१ मध्ये हॅालने पहिले वृक्ष उद्यानाच्या चिंचोळ्या लांब उत्तरपूर्व (panhandle section ) भागात लावले . त्यामध्ये मॅानटेरी पाइन्स, मॅानटेरी सायप्रसu व १० प्रकारचे निलगीरीचे वृक्ष होते ( Eucalyptus) .हॅालने वाळूच्या ढिगा-यापासून माती मिळवण्यास सुरुवात केली त्यामुळे उद्यान समुद्रापासून वेगळे झाले. पण काही राजकारणी लोकांनी सूडबुद्धीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांचे काम अचानकपणे बंद झाले व त्याला राजीनामा द्यायला भाग पाडले. त्यानंतर पूढील १० वर्षे उद्यानाचे काम वंद होते. पश्चातापदग्ध सुपरवायजरच्या बोर्डाने त्याला परत त्याच्या कामावर बोलावले . हॅालने त्यास नकार दिला. पण त्याने या कामासाठी जॅान मेलार्न यांचे नाव सुचवले. ही एक प्रेरित निवड होती. १८८७ मध्ये जॅान मेलॅार्नने गोल्डन गेट पार्कचा पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने या जागेवर ५३ वर्षे काम केले. ‘मेलॅार्न लॅाज’ येथे तो १८९० पासून १९४३ पर्यंत राहत होता ते आजही उद्यानाचे मुख्यालय म्हणून वापरले जाते.
हा स्कॅाटलंडचा रहिवासी अतिशय शिस्तप्रिय व महत्त्वाकांक्षी होता. त्याने सॅनफ्रॅन्सिसकोला येण्यापूर्वी स्कॅाटीश इस्टेटवर उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी उमेदवारी केली होती. येथे आल्यावर त्याने नव्याने गोल्डरशनध्ये श्रीमंत झालेल्या लोकांसाठी उद्याने तयार केली होती. कुठे काय लावायचे यासंबंधी त्याच्या निश्चित कल्पना होत्या. एकावर्षांत ६०००० पेक्षा जास्त बाभळीची झाडे ( Acacia) लावली गेली. त्यानंतर ६० वेगवेगळ्या जातीची पाच लाख बाभळीचे वृक्ष जास्त मोन्टेरी पाईनस् व सायप्रस लावले गेले. मेर्लानला -होडोडेंड्रॅान वृक्ष आवडत होते म्हणून त्याने हॅालच्या निसर्गरम्य उद्यानात आणखी -होडोडेंन्ड्रॅान लावले. आता ते अधिकृतपणे ‘जॅान मेलॅार्न ऱ्होडोडेंड्रॉन डेल’ (दरी ) म्हणून ओळखले जाते. हॅालच्चा नैर्सगिक पद्धतीपेक्षा त्याला संमिश्र पद्धत पसंत होती. त्याची कित्येक उद्याने प्रमाणबद्ध सारखेपणा असलेली व सौंदर्य दृष्टीने तयार केलेली होती. वृक्ष हे वारा अडविण्याच्या उपयुक्ततेसाठी व आकर्षणासीठी, सौंदर्यासाठी लावले गेले.
या एकाधिकारी पण नम्र व विनयशील स्कॅाटिश माणसाच्या ह्रदयांत उद्याना विषयी पूर्ण आत्मीयता होती. त्याला जेव्हा विचारले गेले की तुला वाढदिवसानिमित्त काय बक्षीस हवे आहे? तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘ मला १,०००,००० किलो. गोठ्यातील खत हवे आहे. ‘ यावरून त्याचे उद्यानावरील प्रेम दिसून आले. त्याची इच्छा पूर्ण झाली व त्याने ते खत वाळूच्या ढिगा-यावर पसरले व त्यावरील लागवड पूर्ण केली. त्याने युरोपियन बीच ग्रास, वाहणा-या वाळूला बांधून ठेवण्यासाठी वापरले. या गवताचे बी त्याने पॅरिसमधून आयात केले.
१८७९ मध्ये हॅालच्या राजिनाम्यानंतर व मॅलर्न येण्यापूर्वी
The Conservatory of flowers ( फुलांच्या संरक्षणासाठी असलेली ) ही अतिशय प्रसिद्ध इमारत बांधून तयार झाली. हे १२,००० sq. ft. व्हिक्टोरिअन ग्लासहाउस आहे. ही उद्यानातील सर्वात जुनी व अमेरिकेतील अशा जून्या इमारती पैकी एक आहे. या इमारतीच्या पूर्वेला दुष्काळी भागातील किंवी कमी पाण्यावर जगणा-या वनस्पतींचे अॅरिझोना बाग आहे. पश्चिमेकडे उन्हाळ्यात फुलणारी डेलिया बाग आहे. सुशोभित लाकूड व काच याने बनलेले कॅान्झर्वटरीच्या घुमटात १७०० प्रकारच्या पाण व विषुववृतीय वनस्पती आहेत. त्यामध्ये ॲार्किडस्, प्राणीभक्षक वनस्पती, भव्व्य लीली आहेत. उपयुक्त कीटक व मुक्तपणे फिरणाऱ्या पालींचा तांडा उपद्रवी किटकांवर नियंत्रण ठेवतो. १९०६ सालच्या भूकंपात कॅान्झर्वेटरी वाचली. पण त्याच्या आजूबाजूचे अनेक वृक्ष, वनस्पती, हिरवळ जगली नाही. मोठ्या संख्येने आलेल्या,बेघर सॅनफ्रॅन्सिस्कोवासीयांनी त्याचा नाश केला.त्यांनी कॅान्झर्व्हेटरी दरीत उतररून , मिलीटरीने उभारलेल्या तंबूत निवास केला
राष्ट्रीय एडस् स्मारक विभाग , हे , जे एडसच्या आजाराने मरण पावले व त्यांच्या आप्तांसाठी, ज्यांनी या आपत्तींचे बळी असणाऱ्यावर प्रेम केले व त्यांचा लढा पाहिला त्यांच्यासाठी एक सुंदर जिवंत स्मारक आहे . एडसच्या साथीच्या रोगामुळे सॅनफ्रॅन्सिसको उध्वस्त झाले. यांच्या स्मारकासाठी, १९९१ मध्ये परिसर सुशोभित करणारे वास्तु शिल्पकार, स्वयंसेवक, इतर कामगार व बागकाम करणा-यांनी सात एकराची जागा de Laveaga Dell ( दरी ) मधून पुन्हा जमीन मिळविण्यास सुरवात केली .हे काम १९९६ मध्ये पूर्ण झाले. हे पहिले व एकमेव केंद्र शासित स्मारक आहे.
याच्या पश्चिमेकडे Sunken open Air Plaza ‘ The Music Coneourde ‘ (खालच्या पातळीवरील मोकळा चौक) आहे. ही जागा फ्रेंच उद्यान व विशिष्ट पद्धतीने कापलेले ( pollarded) लंडन प्लॅनचे वृक्ष( London plane trees ) व Wych Elms ( एकप्रकारे वावळ ) यांनी सुशोभित केलेली आहे. आणखी एक विशेष उल्लेखनीय इमारत विज्ञान अकादमी (Academy of Science ) हे अत्याधुनिक नैसर्गिक इतिहास संग्रहालय आहे. ( Natural history museum ) १९२४ सालात उभारलेला पूर्वीच्या विज्ञान संग्रहालयाच्या ठिकाणी हे उभारले गेले.
पाच एकरावर असलेली जपानी बाग ही देशातील सर्वात जुनी जपानी बाग आहे. ही बाग,१८९४ मध्ये झालेल्या प्रदर्शनाचा भाग होती. त्यांत जपानमधील गावाचे दृश्य होते. जपानी संस्कृतीचे भारावून गेलेल्या एका ॲास्ट्रेलियन व्यापाऱ्यानी, जॅार्ज टर्नर मार्शल , याने ती बाग तयार केली होती. तो जपान मध्ये राहिला होता. त्या काळात आशियातील संस्कृती अनोखी, अपरिचित होती. लोकांनी यापूर्वी अशी बाग पाहिली नव्हती. प्रदर्शन संपल्यावरही ‘जपानी टी गार्डन ‘ तसेच ठेवण्यात आले. बागेच्या सुशोभीकरणासाटी व बागेची काळजी घेण्यासाठी एका जपानी व्यक्तीला नियुक्त करण्यात आले. स्टोव लेकच्या काठांवर चीनी मंडपाला भेट देऊ शकता व स्ट्रॉबेरीचा डोंगर चढू शकता. तसेच तुम्हाला अमेरिकन ‘ बायसन’ चे बंदिस्त कुरणही बघता येते .हा एका काळातील प्रसिद्ध सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर होता.१८९१ मध्ये पहिल्यांदा त्यांना येथे आणण्यात आले.
दोन ऐतिहासिक पवनचक्क्या येथे आणण्यात आल्या.१९०३ मध्ये ऊभारलेली पवनचक्कीने उद्यानात ताजे पाणी मिळत असे.. त्याच्या शेजारीच् ट्युलीपची बाग वसंतऋतुत पेटल्यासारखी दिसते. आणखी अनेक गोष्टींचे वर्णन करत येण्यासारखे आहे. हे सुंदर उद्यान, अनेक दशकांपासून त्याचा वापर, दुरुपयोग, पुर्नशोध यात टिकून राहिले आहे.
The Conservatory of flowers.

The Conservatory of Flowers is a greenhouse and botanical garden that houses a collection of rare and exotic plants in Golden Gate Park
Monterey pines at Golden Gate park

Cherry blossom at, Japanese Tea Garden


Golden gate park trail through Silver wattle , Acacia Dealbata

Giant lilies in Golden Gate Park
