याच वर्षी मी कर्मधर्म संयोगाने, लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांचा कॅमल कर्माची (Camel Karma) ची लेखिका इल्स कोलर रोलेफ्सन व जयपूरचे लिटफेस्ट (literature festival) यावर लेख वाचला. मी अतिशय भारावून गेले. माझी ऊत्सुकता खूप ताणली गेली इतकी की मी पुस्तक विकत घेऊन वाचून काढले.
पुस्तकाची लेखिका गेले पंचवीस वर्ष भारतात राहत आहे. एक जर्मन स्री, जिचा या देशाशी, इथल्या मातीशी, संस्कृतीशी दुरन्वयानेही संबंध नाही, अतिशय उष्ण व गरम हवा, भाषेचा गंध नाही, जेवणांत तिखट व अतिरिक्त तुपाचा वापर जो तिला मानवत नाही, रुढ अर्थाने अडाणी जनता, ज्यांच्या स्त्रिया पडद्यांत रहाणाऱ्या, वालूकामय गरम प्रदेश, तरीही ऊंट व त्याचे पालक व प्रजनन करणाऱ्या जमाती यांच्यावर संशोधन करायला ती भारतात येते. पण नंतर राजस्थानातील उंट व त्यांचे प्रजनन करणाऱ्या रायका जमातीच्या उत्कर्षासाठी व उंटाच्या रक्षणासाठीं काम करते. इल्स कोलर राजस्थांनमध्ये १९९१ पासून वास्तव्य करून आहे व आपले आयुष्य राजस्थांनच्या दुर्गम भागांत राहाणाऱ्या रायकां जमातीच्या व त्यांच्या उंटासाठी समर्पित केले आहे. ती LPP ची संस्थापक आहे (league for pastoral peoples). ती २०२४ च्या आंतरराष्ट्रीय कॅमलीडस् या वर्षांची FAO ( food and Agriculture organisation) ची सदस्य आहे. २००२ म्मध्ये तिला उंट व रायका यांचा वारसा जतन करण्यासाठीं, Rolex Association. Award मिळाले . २०१४ मध्ये ‘मारवाड रत्न ॲवार्ड’ व ‘नारी शक्ती पुरस्कार’ या सर्वेाच्च नागरी पुरस्काराने, भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पुढील वर्षी , जर्मनीच्या राष्ट्रपतींनी फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केला. ती Hoofprints on the Land : How Traditional Herding and Grasing Can Restore the Soil and Bring Animal Agriculture Back in the Balance with the Earth (2023) ची लेखिका आहे.
Camel Karma
