विसाव्या शतकाच्या सुरवातीला १०,००० उंट होते.चाळीस वर्षांपूर्वी ५००० उंट होते आता गावांत १००० उंट आहेत आणखी दहा वर्षानी काहीच उंट शिल्लक राहाणार नाहीत.
रुपाराम रायका अंजी-की- धानी.
गॅरी,जॅान व आएशा विमानाने ऊदयपूरला येतात. हणमंतसिंगच्या गाडीने सगळे साद्रीला येतात. डॅा. देवाराम ऊत्साहाने पुढचे प्लॅन बनवतो. त्याच्यामते तिने मारु रायकांना भेटणे जास्त गरजेचे होते. मारु रायका हे उंटांचे खरे प्रजनक आहेत.गोदवारच्या रायकांनी फक्त शंभर वर्षांपूर्वी उंट पाळायला सुरवात केली. डॅा. देवारामला त्यांना अंजी-की- धानी या गावांत घेऊन जायचे असते. त्या गावात हजारो उंट असतात. हणमंतच्या गाडीत विनय व सर्वजण दाटीने बसतात. अंजी-की- धानी हे अतिशय सुस्त गाव असते जेथे काळ जणू थांबलेलाच असतो.
गावाच्या प्रवेशद्वाराशी ओळींत पांढरे स्मरणार्थ
दगड असतात. त्यावर त्यांचे आदरणीय पूर्वज उंटावर बसलेले असतात. त्याच्या बाजूलाच भव्य कडुलिंबाच्या झाडाभोवती मोठ्या कट्ट्यावर वृद्ध माणसे आराम करत असतात. तो कट्टा येणाऱ्या पाहुण्यांसाठी करमणुकीसाठी बांधलेला असतो. कोणीतरी वाफाळलेला उंटाच्या दुधाचा चहा आणून देतो .देवाराम त्यांच्या येण्याचे कारण सांगतो. तिच्या मुलांच्या तपकिरी केसाने व गोऱ्या कातडीने सर्वांची उत्सुकता वाढते. मुले रायकांच्या मुलांत खेळायला जातात ती मुले मातीचे ऊंट करतांत
तेवढ्यांत देवारामला समजते की. येथील उंट वीस कळपांत विखुरलेल आहेत. ते वेगवेगळ्या जागी चरत असतात व वर्षातून फक्त एकदा होळीच्या वेळेस अंजी-की -घानाीला येतात. ती
खूप निराश होते. त्यांच्यातील एक तिला सांगतो की, त्याचा तोला (. कळप ) जवळच रात्री मुक्कामालाआहे.. ते सकाळी सात वाजेपर्यंत त्यांना बघायला येऊ शकतात. ते डॅा. देवारामकडे रात्रीचा मुक्काम करायचे ठरवतात. डॅा देवाराम पचुंदा कलान नावाच्या गावात राहत असतो. त्याचे छोटे घर छान असते. त्याचे आईवडील व दोन मुले व बायको राहतात. शेजारीच त्याच्या तीन भावांचीही घरे असतात. ते मेंढ्यांना घेऊन फिरतीवर असतात. डॅा. देवारामच्या नात्यातल्या सर्व बायका तिला भेटायला उत्सुक असतात व तिलाही त्यांच्याशी मैत्री करायची असते.बायकांचा व मुलींचा घोळका तिची वाट बघत असतो. त्या तिला घेरतात. तिच्या कपड्याना हात लावून बघतात. तिचे गालगुच्चे घेतात.मोठ्यांदा बोलतात. एकजण मोठ्या गोणीत असलेले चांदीचे दागिने ओढत आणते .अनेक प्रकारचे दागिने त्या घालतात. रंगीबेरंगी कपडे घालतात. ओढण्या घेतात . तिला अनेक फोटो काढायला लावतात तरी त्यांचे समाधान होत नाही. त्यांचा ऊत्साह ओसंडून जात असतो. शेवटी ती दमते.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते ठरवलेल्या जागी येतात. अडोजीचा देखणा मुलगा गौतमराम गुलाबी फेट्यात त्यांची वाट बघत ऊभा असतो. त्याची गाडी खडबडीत धुळीच्या रस्यावरून बाभळीच्या जंगलातून जाते. त्या उंटांचा कळप तोला, चौधरीच्या मोहरीच्या कापणी केलेल्या शेतात असतो. काही उंट त्यांचा कडबा रवंथ करत असतात तर काही उभे असतात. त्याचे बांधलेले पाय सोडायची वाट बघत.नवीन जन्मलेली वासरे बागडत दुडदुड उड्या मारत होती.आवाज करत आपल्या आजूबाजूचा प्रदेश न्याहाळत होती.त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फेटे घातलेली माणसे होती. त्यांच्यातला पिवळा फेटा धातलेला अडोजी होता. त्याने त्यांना
शेताच्या टोकाला असलेल्या शेकोटीशी जायला सांगितले. त्याने यांच्यासाठी बसायला भाकल ( उंटाच्या केसापासून बनवलेली सतरंजी)घातले व ताज्या चहासाठी ऊटाचे दूध काढायला सांगितले. जॅान व आयेशा त्यांच्या आईला धावत , धावत सांगत आले की एक मादी उंट नवीन पिल्लाला जन्म देत होती. एका बाभळीच्या झाडाच्या सावलीत एक मादी उंट नवीन वासराला जन्म देत होती. एक रायका तिच्याशी अतिशय सौम्य व समजावणीच्या सुरांत बोलत होता. अगदी काही मिनीटांतच नवीन वासराचा जन्म झाला. इल्सच्या मते हे ऊंटाचे बाळंतपण इतर प्राण्याच्या तुलनेने अतिशय जलद व दुःख रहित होते. ते नवीन जन्मलेले अभ्रक त्याच्या उंच व बारीक पायांवर उभे राहण्याचा लगेच प्रयत्न करीत होते पण ते खाली पडते. अर्धातासाने परत धडपडत उभे राहायचा प्रयत्न करते पण पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडते.
तोपर्यंत बाकीच्या कळपाची चरायला जायची वेळ झालेली असते. ते रात्रीच्या मुक्कामाला परत तेथे येणार असतात. हे ऊंटांचे कळप एका ठिकाणी कधीही दोन दिवसापेक्षा जास्त दिवस मुक्काम करत नाहीत. त्यामुळे सतत नवीन जागेच्या शोधात रहावे लागे. हे काम अडोजीचे होते. त्याचे जमीनदारांशी दीर्घकालीन संबंध होते. ते त्याच्या ऊंटाना बोलवत असत कारण त्यांना उंटांचे शेण मिळत असे. त्या बदल्यात अडोजीला पैसे मिळत असत.
होळीच्या वेळी हे सर्व उंट अंजी -की – धानीला एकत्र येत असत. त्यांची लोकर कापण्याचा कार्यक्रम असे. सर्व गावकरी आपापल्या परीने मदत करत. अडोजीने त्यांना अतिशय आग्रहाने परत होळीला यायचे आमंत्रण दिले. त्यावेळेस अंजी-की -धानी ला २०००० ते३००००. उंट जमा होतात. होळी हा सण हिवाळ्याचा शेवट व उन्हाळ्याची सुरवात दर्शवितो. हा सण रंगांची उधळण करून साजरा केला जातो.
या वेळेला अडोजीबरोबर विचारांची अविस्मरणीय देवाण घेवाण होते व ती लांबून सुरक्षित शैक्षणीय अंतर ठेऊन बघणारी व सहानुभूती दाखवणारी न रहाता सक्रीय भागधारक होते. अडोजीचा त्याला व त्याच्या संधटनेला मदत करण्याची विनंती तिच्या डोक्यात घुमत राहते. त्याचे म्हणणे तिला पटते की फक्त फोटो घेऊन काय फायदा? तिने कॅम्प घ्यावेत. तिला खरोखरच समजत नाही की कसले कॅम्प घ्यायचे ? तिला मिळणारे अनुदान अतिशय तुटपुंजेच असते. तिला वाटते की या सगळ्यासाठी तिला त्यांच्या समस्यांविषयी माहिती , आकडेवारी लागेल जी तिच्याजवळ नसते. ते साद्रीला परत आल्यावर माहिती गोळा करायला लागतात.
विनय अनेक लोकांशी बोलून तिला माहिती मिळवण्यासाठी मदत करतो.साद्रीच्या आसपास मिळून ५००० ऊंट असतांत. पण मागील दहा वर्षांपासून त्यांना चरायला जागा मिळणे कठीण होत जाते. यांचे मुख्य कारण म्हणजे जास्त , जास्त खोल विहीरी खणल्या जात होत्या जेणेकरून शेतकऱ्यांना दोन किंवा तीन सुद्धा पिके घेता येतील. पडीक जमीन, चराऊ कुरणे कमी झाली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व गावांची स्वतःची चराऊ जमीन असे तिला ‘गोचर ‘ म्हणत. पण अशा जमिनीकडे संपूर्ण दुर्लक्ष होते व ती जागा झुडुपांनी व्यापते जी गुरांना खाण्यासाठीं योग्य राहत नाही. मुख्य संकट पावसाळ्यात येते. पूर्वी पावसांळ्यात जेव्हा शेतात पिके घेतली जात तेव्हां शेकडो वर्ष उंट आरवली पर्वतांच्या जंगलांत चरत, पण आता साद्रीच्या आजूबाजूची जंगल, ‘वन्य अभयारण्य ‘ म्हणून घोषीत होतात व ती कुंभलगड अभयारण्याचा भाग होतात. त्यामुळे तेथे चरण्यांस बंदी येते.
भालाराम रायका त्यांना सांगतो की हे संकट १९७५ पासून आणीबाणीच्या काळांत सुरू होते. सरकार वीस सूत्री कार्यक्रम अंमलात आणते . त्यांत एक कलम असे असते की जंगलांना संरक्षण व नर्सरीची स्थापना. सरकार सर्व चराऊ जनावरांवर पैसे आकारायला लागते . चराऊ ऊंटांवर दिवसाचा२.५ इतका कर आकारला जातो.नव्वद साली सर्व चराऊ जनावरांवर जंगलांत बंदी आणण्यात येत. पुढचे सरकार ती बंदी उठवते पण बंदिस्त जंगलाचा भाग उघडला जात नाही. असा गोंधळ चालू रहातो.
रायका जागतिक बँकेच्या प्रोग्राम विषयी तक्रार करतात तेव्हां त्यांना मेंढ्याची संख्या कमी करा व तुमच्या मुलांना शिकवा असे उत्तर मिळते.
त्याची जनावरे जंगलात चरतांना आढळली तर जप्त केली जातात .
ती जमेल तशी माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. या सर्व अडचणी समजून घेण्यासाठी,
एका नावाने ती मोहित होते ते म्हणजे , राजपूत हिरो पाबुजी . स्थानिक पौराणिक कथेनुसार पाऱ्बुजी हा पहिल्यांदा उंट राजस्थान मध्ये आणतो.डॅा. देवाराम तिला त्याच्या गावातल्या पाबुजीच छोटेसे देऊळ दाखवतो.. उंटाविषयी कोणतीही नवीन गोष्ट करतांना मारु रायका प्रथम प्रसाद ठेवतात. पाबुजीने उंट राजस्थानांत कसे आणले यांचे उत्तर फक्त भोपासागू शकेल असे विनय व डॅा. देवाराम सांगतात. ते तिला सांगतात की भोपा या लोकांना पाबुजीची पूर्ण कथा माहीत आहे . ते पाबुजींचे पुरोहित असतात.त्यांच्याकडे कापडाची लांब गुंडाळी असते. त्याच्यामध्ये पाबुजीच्या जीवनांतील अनेक प्रसंगांचे चित्रण असते. त्याला पार्ह असे म्हणतात.त्याला हलणारी वेदी किंवा पवित्र जागा म्हणतात. ती फक्त रात्रीच उघडली जाते.
साद्री जवळच्या एका गावांत एक भोपा रहात असतो . तो फक्त कापडाचा स्क्रोल ( गुंडाळी ) उघडून दाखवायला तयार नसतो. त्याला पूर्ण प्रयोग दाखवायचा असतो. एका गावातील एक उंट आजारी असतो. त्याचा मालकाने भोपाला त्यांच्या गावात प्रयोगासाठी बोलावले असते.पण त्याच्याकडे पैसे नसतात.पाबुजीची पूर्ण गोष्ट दाखवायला चौदा रात्री लागल्या असत्या . म्हणून ते पाबूजीच्या आयुष्यांतील एक प्रसंग निवडतात.
लाल व तपकिरी रंगाचे मादी उंट राजस्थानात आणण्याची गोष्ट.
भद्रासला गावांच्या देवस्थानाच्या मोकळ्या जागी ती व हणमंत भोपा व भोपीला आणायला जातात. ते खरोखरच अतिशय गरीब असतात .त्यांच्या जुन्या कपड्यांकडे पाहून तिला जाणवते. तिन्हीसांजेला ते गावात येतात. पूर्ण गाव तो प्रयोग बघायला गोळा झालेला असतो.
संगीत,गाणे , नाच व पठण , तिला व लहान मुलांना मंत्रमुग्ध करते. तिला त्यातील एकाही शब्दाचा अर्थ कळत नाही.
विनय तिला अर्थ सांगायाचा प्रयत्न करतो.
एकदा पुष्करला भेट दिली असतांना पाबुजी त्याच्या पुतणीचे लग्न गोगाजी चौहाण याच्याशी जमवतो.पाबुजी तिला लग्नाची काहीतरी असामान्य भेट द्यायचे कबूल करतो. तो तिला लाल व तपकिरी रंगाचे मादी उंट द्यायचे कबूल करतो. ते कुठे मिळतील हे त्याला माहित नसते. तो हरमल रायकाला रावणाच्या लंकेत पाठवतो. तो संन्याशाच्यावेशांत जातो.
रावणाचे सैनिक त्याला पकडतात. तो त्यांच्याकडे थोडे दूध मागतो . ते सांगतात की त्याच्याकडे फक्त लाल व तपकिरी मादी उंटाचे दूध आहे. हरमल रायका राजस्थानला परत येतो व पाबुजीला उंटा विषयी सांगतो. पाबुजी रावणाचा पराभव करतो व सातशे दूध देणारे व सातशे इतर उंट घेऊन येतो.
त्यानंतर एप्रिल चालू होतो. अतिशय गरम होऊ लागते. ती लडाखला थंड हवेत ट्रेकिंगला जाते. ती पुस्तकाच्या सहाय्याने हिंदी शिकण्याचा प्रयत्न करते.
तिला परत एकदा राजस्थानला शेवटची भेट
देऊन सगळ्यांचा निरोप घ्यायचा असतो व तिला अपराधीपणाची भावना मनातून काढून टाकायची असते. ती तिच्या नुकत्याच शिकलेल्या हिंदीत अतिशय काळजीपूर्वक हणमंतला पोस्टकार्ड टाकते व जोधपूर एअरपोर्टला बोलावते. ती साद्रीला डॅा.देवारामला भेटते. ते रायकांसाठी काय करता येईल यावर विचार करतात. डॅा.देवाराम सांगतो की त्याला त्याच्या जातीसाठी एक सोसायटी तयार करायची आहे. त्याची जात अतिशय मागासलेली आहे त्यांना सुधारायची गरज आहे.
त्यांच्या बायकांना स्वच्छतेचे धडे द्यायची गरज आहें .तसेच महिलांना पैसे मिळविण्याचे साधनही द्यायला हवे. इल्स सांगते की त्यांच्या उंटाना औषधे द्यायची गरज आहे.
ती तेथून डॅा. खन्नांना भेटायला बिकानेरला जाते. त्यांना तिच्या संशोधनाची प्रत देते.
नंतर ती जयपूरला जायला निघते. बाहेर वातावरण भट्टी सारखे गरम असते.
रात्री ती तेथील संस्कृती व रीति रिवाजांवर विचार करते व अजूनही तिला स्वतःला ती उपरी असल्यासाखे वाटते.राजस्थानी जेवण तिला कधीच मानवत नाही कारण मिर्ची व तुपाचाखूप वापर . त्यामुळं केळी , पार्ले बिस्कीटस व अनेक चहाचे कप यावरच ती राहते . आणखीन एका गोष्टींचे तिला आश्चर्य वाटते म्हणजे कोणीच आपल्या भावना व्यक्त करीत नाही.
अनेक दिवसांनी डॅा. देवाराम त्याच्या घरी जातो तेव्हां त्याची बायको त्याची दखलही घेत नाही . ती आपले काम चालू ठेवते. कोणालाच भावना नसतात का? त्याची मुलेही त्याच्या जवळ येत नाहीत. डॅा.देवाराम तिला सांगतो की त्यांच्या समाजात एकत्र कुटुंब पद्धतीत मुलें सर्वांचीच असतात. त्यालाही आपल्या मुलांना जवळ धेता येत नाही याचे वैशम्य वाटते. पण घरांतील वडिलधाऱ्या माणसांसमोर प्रेम व्यक्त करणे त्यांच्या संस्कृतीत बसत नाही.
तरीही अशा चमत्कारिक व अनाकलनीय वातावरणात तिला परत यायचे असते.
तिला राजस्थानी समाजाचे भाग व्हायचे असते . परकीय म्हणून राहायाचे नसते.
- [ ] आणखी एक कारण म्हणजे तिचा ड्रायव्हर. तो अतिशय अबोल व लाजरा असतो. त्याच्या नावाखेरीज तिला काहीच माहित नसते. पण त्याची गाडी म्हणजे तिचे आश्रयस्थान असते. तो तिचा आधार असतो. तो तिच्या संरक्षणार्थ नेहमी हजर होतो . गाडीमध्ये फक्त ते दोघे असल्या शिवाय तो थेट तिच्याशी कधीच बोलत नसे. जेव्हा ते गाडीतून बाहेर पडायचे तेव्हा तो जवळ येण्याचे टाळत असे . जणू त्याला तिच्या सोबत दिसण्याची लाज वाटे . ते चहासाठी ढाब्यावर थांबले तर साहजिकच ती बसण्यासाठी त्याच्या शेजारी असलेली खुर्ची निवडत असे. पण तो उठून दुसऱ्या ठिकाणी खुर्चीवर बसत असे जेणेकरुन त्यांच्यामध्ये थोडे अंतर राहील. हे पाहून तिला वाईट वाटे पण दुसरीकडे, जेव्हा तिला त्याची गरज भासे तेव्हा तो हजर असे . जर ती कधी संकटात सापडली किंवा कोणीतरी तिला त्रास दिला, तर तो तिला संकटातून बाहेर काढण्यासाठी जादूने कोठूनही प्रकट होई . तिच्या प्रमाणे तो सुद्धा काय चालले आहे या बाहेरील सर्व गोष्टींचे निरीक्षण करत असल्याचे दिसत होते. तिला वाटते की , तो तिला पाहिजे तिथे तिच्या बरोबर जाईल व तिला माहित होते की , ती त्याच्या बरोबर सुरक्षित होती. ही परिस्थिती तिला पुढे काम चालू ठेवण्यास एक महत्वाचे कारण होती.
दिल्लीतील तिचे शेवटचे काम होते की,, पुष्करमधील प्रसिद्ध उंट बाजार पाहण्यासाठी ती नोव्हेंबरमध्ये तिच्या उर्वरित फेलोशिप महिन्यात परत येऊ शकेन का हे विचारणे.