रबारी किंवा रायका यांत दोनप्रकार आहेत. मारु रायका व चालकिया रायका.
मारु रायका जास्त वरच्या श्रेणीचे समजले जातांत. ते चलकियांच्या मुलींशी लग्न करतात. पण आपल्या मुली त्याच्याकडे देत नाहीत. फक्त ऊंटांमध्ये व्यवहार करतात. चलकिया रायका मुख्यतः शेळ्या व मेंढ्यांचे मोठे कळप पाळतात. ते मोठ्या संख्येने गोदवारमध्ये राहतात.
त्यांच्या बायका पितळ्याचे दागिने घालतात. म्हणून त्यांना पितालिया असेही म्हणतात. ( Castes of Marwar ) census report of 1891. February 1991.
ती जोधपूरमध्ये, घुमर टुरिस्ट बंगल्यांत उतरलेली असते. तिथल्या मॅनेजरला ती सांगते की, तिला चांगल्या ड्रायव्हरची गरज आहे. आत्ता पर्यंतचा तिचा ड्रायव्हर बद्दलचा अनुभव चांगला नसतो. ते कधी येतच नाहीत तर कधी उशीरा येतांत तर कधी पैशांवरून वाद घालतात.
आदल्या दिवशी रात्री ती बिकानेरहून जोधपूरला टुरिस्ट बसने आलेली असते. तिला साद्रीला डॉ. देवाराम देवासीला भेटायला जायचे असते. टुरिस्ट बंगल्याच्या बाहेर नवीन कोऱ्या ॲंबेसिडर गाड्यांचा ताफा ऊभा असतो. मॅनेजर एका ड्रायव्हरला घेऊन येतो. तिला तो असाधारण वाटतो. कुठेतरी तिला मनातून वाटते की हा ड्रायव्हर तिला लाभदायक ठरेल. राजस्थानातील प्रसिद्ध व मुख्य दोन पूर्वीची राज्ये म्हणजे मारवाड व मेवाड. मारवाड म्हणजे “मृत्युचा प्रदेश”, कारण तो प्रांत मुख्यत्वे सपाट भीतिदायक वाळवंटाचा आहे. जोधपूर त्याची राजधानी व राजाच्या राज्यकारभाराचे आसन होते. त्यांचा प्रवास डोंगराळ व जंगल असलेल्या मारवाडकडे चालू होतो. जो उदयपुरच्या महाराणाचा प्रांत असतो. शंभर किमी गेल्यानंतर ते मुख्य रस्ता सोडून लहान रस्त्याला लागतात. क्षितीजावर आरवलीच्या डोंगरांचे अंधुक छायाचित्र दिसू लागते. . भौगोलिक दृष्ट्या आरवली पर्वत राजस्थानच्या उत्तर पूर्वेकडून नागमोडी वळण घेत दक्षिण पश्चिमेकडे जातो व थरचे वाळवंट व एक कुबडाच्या उंटाचा प्रजननाचा प्रदेश येथील पूर्वेकडची सीमा तयार होते.
त्यांनी मारवाडचे वाळवंट पार केले व ते गदवालला येतात. हा अरवलीच्या पायथ्याचा प्रदेश सुपीक व सौम्य हवामानाचा आहे. त्यामुळे दोन्ही राज्ये ह्या प्रदेशावर स्वामित्व सांगत. खेजरी व बाभळीच्या झाडांची गर्दी वाढते. पिंपळही दिसू लागतात. बुजगावणे असलेली हिरवी शेतेही दिसू लागतात. गावांच्या वेशीजवळ आल्यावर फळबागा व किरमिजी रंगाच्या बोगनवेली रस्त्यांला लागून असलेल्या भिंतीवर उंच चढलेल्या दिसू लागल्या. सूर्य अस्ताला जात होता व त्याच्या सौम्य पण तेजस्वी प्रकाशांत सगळा परिसर नाहून गेला होता. अशा वातावरणांत ते साद्री या छोट्याश्या डोंगरांच्या रांगेत असलेल्या गावात येतात. भाजी मार्केट पार करून ते पशुवैद्यकीय हॅास्पिटलच्या मोठ्या इमारतीपाशी येतात. बरेच दिवसांनी भेटलेल्या नातेवाईका सारखे डॅा. देवाराम त्यांचे स्वागत करतो. त्याच्याकडे आणखी एक पाहूणा दिल्लीहून आलेला असतो.त्याचे नाव विनय श्रीवास्तव असते. तो मानववंश शास्त्रांचा विद्यार्थी असतो. त्याचे रायकांवर संशोधन चालू असते. रायका व त्यांचे उंट या संबंधी प्रत्यक्ष जागेवर भेट या संबंधी त्या दोघांनी मिळून पुढच्या काही दिवसांचा आराखडा आखलेला असतो. विनय सांगतो की , येथे गोदवालमध्ये चलकिया रायका मोठ्या संखेने आहेत. ते मारु रायकांशी लग्न करत नाहीत. त्याची फेटा बांधण्याची पद्धत व त्यांच्या चालीरीती मारु रायकांपेक्षा वेगळ्या असतात. पण ते एकाच थाळींतून जेवतात. कमल कोठारींनी सांगितलेली माहितीच विनय देतो. रबारी हे सर्वसाधारण नाव आहे. गुजराथमध्ये जास्त रबारी आहेत. ते जास्त जनावरे पाळतात. रायका या नावाने मारवाड मधील रबारी ओळखले जातात. ते मुंख्यतः उंट पाळतात व त्यांचे प्रजनन करतात व शिकलेले रबारी देवासी म्हणून ओळखले जातात. पण या सर्वांचे मूळ एकच आहे. नंतर त्याने सांगितले की, मारवाडला रायका जैसलमेरमधून आले जे सर्वात पश्चिमेला असलेल शहर पाकिस्तानच्या जवळ आहे. तिथे ते बहुदा अफगाणिस्थानातून आले किंवा पर्शिया मधून आले.
रायकांच्या मुळाविषयी खूप वेगवेगळी व गुंताागुंतीची मते आहेत. तिला साद्री गाव आवडते. तेथे खूप गर्दी व घाई नसते. त्या गावाचे स्वतःचे विश्व असते. तेथे हॅाटेल्स नसतात. पण मुक्तीधामचे हॅास्टेल असते. साद्रीमध्ये रेस्टॅारंटही नसतात. अेक खाणावळ म्हणजे एका भिंतीत मोठे भगदाड असते. तिथे या तिघांना बसायला कशीबशी जागा व चूल असते. मोठी ज्वारीची भाकरी त्यावर तुपाची धार तिखट चटणी व लाल रश्यातल्या भाज्या या सर्वांने तिचे तोंड चांगलेच पोळते. धर्मशाळेतील लहान थंड खोली किरकिरणारे लोखंडी दार , खोलीत आधीच कोणीतरी वापरलेले जाडेभरडे ब्लॅकेट असते. तिच्या नोटस् लिहिण्या आधीच तिला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मोरांच्याआर्त ओरडण्याने जाग येते. मंदिराच्या हिरळीवर एक मोर व अनेक लांडोर नाचून एकमेंकांना आकर्षित करत होते. नंतर ते लटाडा गांवांत जातांत. आठपैकी पाच रायका कुटुंब उंट पाळत होते.तेथे ते सावंतिबा रायकाला भेटतात. तो त्यांचे रामराम म्हणून ऊत्साहाने स्वागत करतो. त्याच्या गेरुने रंगविलेल्या झोपडीच्या अंगणात वीस उंट दाटीवाटीने बसलेले असतात. इल्स व देवारामला सावंतिबा पर्यंत पोचायला त्या उंटामधून मार्ग काढावा लागतो. देवाराम त्यांच्या येण्याचे कारण सांगतो. सावंतीबा उंच अतिशय बारीक व संपूर्ण पांढऱ्या कपड्यांत असतो. घरातल्या चुलीतून येणारा धूर गोलाकार ( चक्राकार ) फिरत आकाशांत पसरतो. वारा कडुनिंबाच्या झाडांमधून सळसळत होता. कळपांतील उंट हळूहळू ऊठायला लागतात . त्यांच्यात एक नर असतो व दोन नवीन जन्माला आलेले उंट असतात. त्यातील एक आजूबाजूला उड्या मारण्याचा प्रयत्न करतो. दुसरा उभे राहण्याचा प्रयत्न करतो पण खाली पडतो. सावंतिबाचा नातू त्या पहूडलेल्या उंटामधून त्यांच्याकडे येण्यासाठी उंटाच्या बाहेर आलेल्या मांडीच्या हाडांचा आधार घेत मार्ग काढतो.
ते पाहून तिला परत तिचे कॅालेजचे दिवस आठवतात . त्यांना सांगण्यात आलेले असते की, मोठी जनावरे संभाव्य धोकादायक पशू असतील. मोठ्या जनावरांजवळ त्यांना बांधल्याशिवाय जाऊ नका . नाहीतर त्यांना झोपवा किंवा गुंगीचे औषध द्या. पण इथे तिला फार वेगळा अनुभव येतो. हे उंट त्यांच्या कुटुंबाचे सदस्य वाटत होते. त्यांना अतिशय प्रेमाने वागवले जात होते. कोणाला त्यांची भीती वाटत नव्हती. तिला तिचे जॅार्डनमधलेही दिवस आठवतात. नंतर साधारण एक बारा वर्षांचा मुलगा तिला उंटाच्या दुधाचा वाफाळलेला चहा आणून देतो. हे पेय अनेकतास उंटांच्यामागे फिरतांना शक्ती देणारे असते.
सावंतिबा त्या लाल फेटा घातलेल्या मुलाला त्या पडलेल्या उंटाला उभे करायला सांगतो. तो मुलगा त्या बछड्याशी बोलतो. त्याला थोपटतो आधी बसायला व नंतर उभे राहायला मदत करतो. तो उंट धडपडत तिच्याकडे येतो. तेव्हा इल्सला समजते की काहीतरी गडबड आहे. ती सावंतिबाच्या सांगण्यावरून त्याला तपासते तेव्हा तिच्या लक्षांत येते की त्याच्यामध्ये काहीतरी जन्मतःच व्यंग आहे. जसजसा तो मोठा होईल तसा तो सुधारेल असे ती सांगते. सावंतिबा सांगतो की , सध्या त्याच्या कळपाला खूप समस्या आहेत. अनेक गर्भपात, अपुऱ्या दिवसांचे जन्म, नवीन जन्माला आलेल्यांचा मृत्यू इत्यादी अडचणीना तोंड द्यावे लागते आहे. त्याच्यामते गर्भपात , कदाचित कळपाला नुकत्याच झालेला खोकला व निमोनियामुळे असणार. सावंतिबाच्या भावाचा एक उंट आदल्या दिवशीच अचानक मरतो. तो कशामुळे मेला हे समजत नाही. ती सुचवते की त्या उंटाचे काही नमुने ( सॅम्पल्स) घेऊन लॅबोरोटरीत पाठवा. पण देवाराम सांगतो की तिथे जवळपास अशी लॅब नाही व मेलेल्या प्राण्याला हे लोक हात लावत नाहीत. सावंतिबाची व त्या तिघांचीही निघायची वेळ होते. ते त्या नवीन पिल्लाला शक्तीसाठी व पाय सरळ करण्यासाठी औषध द्यायचे व परत यायचे आश्वासन देतात. ती त्या लाल पागोटा बांधलेल्या मुलाचे नाव विचारते ज्याने अतिशय चपळाईने त्या उंटाच्या वासराला उभे केलेले असते. त्याचे नाव सावाराम असते. तो १२ ते १३ वर्षाचा मुलगा सावंतिबाच्या लहान भावाचा असतो. लौकरच तो मुंबईला मिठाईच्या दुकानांत कामाला जाणार असतो. हे ऐकून इल्सला धक्काच बसतो. हा शांत व मोकळ्या गावातला मुलगा मुंबईच्या गर्दीत कसा राहील असे तिला वाटते. नंतर ते जेव्हां त्यांच्या गाडीशी येतात तेव्हां त्यांच्या गाडी भोवती अनेक मोठ्या शिंगांच्या गाई व म्हशी उभ्या असलेल्या दिसतात. अशा गावातल्या जनावरांच्या कळपाला चापा असे म्हणतात. ते त्या गावच्या गुराख्याची वाट बघत असतात. गावातील प्रत्येक घरांत एक गाय असते. या सर्वांना चरायला घेऊन तो जातो व संध्याकाळी परत आणतो. ही सर्व गुरे आपापल्या घरी जातात . त्याला’ गउल’ म्हणतात. त्यांना या गुरांच्या आजारा विषयी पारंपरिक जास्त चांगली माहिती आहे असे देवाराम सांगतो. तिला पहिल्यांदाच तिच्या पशुवैद्यकीय ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल खंत वाटते.
पुढच्या तीन चार दिवसांत या दोघांच्या बरोबर ती आणखी कळपांना भेट देते. ड्रायव्हर अतिशय मदत करणारा असतो. त्याची काहीही तक्रार नसते. सकाळी सहा वाजल्या पासून ते अगदी रात्रीपर्यंत. सावंतिबा हा एकटाच रायका उंटांच्या आजाराविषयी तक्रार करीत नसतो ,तर इतर अनेक उट प्रजोत्पादन करणाऱ्या रायकांच्या गर्भपात, अनेक उंटांचे मृत्यू, अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण इ. समस्या असतात. राजाराम या एका प्रतिष्ठित रायकाच्या मते गर्भपात हे टीबुरसा ( Trypanosomiasis ) या ऊंटांच्या आजारांमुळे होत असणार. हा आजार मलेरिआा सारखा रक्तातील पॅरासाइटमुळे होत असणार व तो एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला माशा चावून होत असणार. रायकांना या आजारावर ऊपाय माहित नव्हता. ते या रोगाने पछाडलेल्या उंटाला तीन वर्ष वेगळे ठेवत असत. रायका टिबुरसा ओळखण्यांत पटाईत होते. ते लघवीच्या वासावरून ओळखत. त्यांची खास पद्धत होती. ते उंटाची लघवी व वाळू यांचे अंड्याच्या आकाराचे बॅाल तयार करत. नंतर दहा मिनीटांनी वाळवून ते फोडून हुंगत. इल्सही एक बॅाल हुंगते तेव्हा तिला ॲसिटोनचा वास येतो व तिला आठवते की पूर्वी तिच्या प्रॅक्टीस मध्ये काही गाईंना एसिटोनेमिया (acetonemia )हा आजार झाला होता. गमनाराम रायकाच्या मते उंटांना पुरेसे अन्न मिळत नसे म्हणून हे गर्भपात होत होते. इल्सला रायका स्रियांविषयी अतिशय कौतुक व आश्चर्य वाटते. त्या अष्टपैलू असतात. त्या शेळ्या मेंढ्या विकण्याच्या व्यवहारांत भाग घेत. त्या खूप कष्टांची कामे करत. त्या परंपरेने आलेल्या आचार, विचाराने बांधलेल्या होत्या. त्याच्या नवऱ्यांच्या सगळ्या आज्ञा त्या हसतमुखाने झेलत. त्यांचे पेहराव, रोजचे कपडे, मोठ्ठे घेरदार लांब घागरे, नाकातील पितळ्याची मोठी सुंकले, व इतर चांदीचे दागिने या असल्या भरगच्च पेहरावांत त्या पाणी व जळणासाठी लाकूड आणत .जनावरांचे गोठे साफ करत, स्वयंपाक करत, मुलांना शाळेसाठी तयार करत, त्यांच्या नवऱ्यांसाठी रोट्या व चटणी तयार करत व कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आठ तास रस्त्याची कामे करत. ती स्वःताची त्या नारी शक्तीशी तुलना करते व ती स्वतःला फार कमी समजते. (कमी कर्तबगार) रायका पुरुषांचे आयुष्यही कठीण असते. दिवसभर उन्हातान्हांतून ते आपल्या चरणाऱ्या उंटाच्या मागे असतात. त्यांचे दिवसभराचे खाणे म्हणजे त्याच्या खांद्यावर बांधून दिलेल्या रोट्या आणी चटणी. सूर्यास्ताला घरी आल्यावर त्याच्या कळपांतील उंटांच्या जखमा बघणे, जनावरांचे दूध काढणे व नंतर शेकोटी भोवती बसून कुटुंबाबरोबर जेवण करणे. यात कधी बदल होत नसे. ऊन, पावसाळा, हिवाळा उन्हाळा ही दिनचर्या चालू असे. अगदी आजारी पडले तरी त्यातून सुटका नसे.
उंट हे शेतांत चरत, किंवा पावसाळ्यांत त्यांना जंगलांत सोडत. अनेक उंट त्यांच्या वय्यक्तिक नावाला प्रतिसाद देत असत. बहुतेक वेळेला नावे त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यावरअसत. उदा.काणी ( एक डोळा असलेली ) झिपरी, मेवारी इ. ते पाच वेगवेगळे आवाज काढून उंटांशी संवाद साधत. या वेगवेगळ्या आवाजांनी, त्यांना चालायला, थांबावयाला, एकत्र जमा व्हायला,खायला ऑर्डर देत. ऊंटपाळ त्या सगळ्यांच्या मधून सहज फिरत असे. बहुतेक उंट सौम्य व शांत असत. त्यांचे दूध काढतांना ते शांतपणे उभे रहात. काही माद्या सहज दूध देत , काहींना त्यांचे बछडे समोर लागत, तर काही ठराविक लोकांनाच दूध काढू देत.
उंट सर्व साधारणपणे सौम्य व शांत असतात. इल्स संपूर्ण परकी असूनही ती त्यांना थोपटू शकत होती. उंटांना त्यांच्या कानामागे खाजवलेल आवडत असे. काहीं दिवसांनी त्यांना मिळालेली माहिती बरीच सुसंगत होती. सरासरी रायकांच्या कुटुंबात त्यांच्या वासरा सहित दहा ते वीस मादी उंट असतात व काहींवेळा एक नर उंट प्रजननासाठी असतो ृ. तरुण उंटांना कामासाठी गाड्यांच्या मालकांना व शेतकऱ्यांना विकणे हा मुख्य उद्देश उंटांचा कळप
पाळण्याचा होता. हे वर्षांतून एकदा पुष्करला उंटांच्या मेळ्यांत होत असे. उंटांचे शेण हे अतिशय चांगले खत म्हणून त्याचा प्रभाव दीर्घ काळ टिकणारा असतो व त्याचे विघटन होण्यास तीन वर्ष लागत. त्याची शेतकऱ्यांना विक्री होत असे, धान्यासाठी अथवा रोख रकमेसाठीं. हे सर्व व्यवहार सांभांळणे हे पूर्णपणे बायकांच्या कार्यक्षेत्रात येत असे. त्या उंटांच्या शेणाचे ढीग त्यांच्या अंगणांत ठेवत. जर उंटांचा मुक्काम रात्री एखाद्या शेतात असेल तर रायकांना चहा, पीठ व बिड्या मिळत असत व काही वेळेस खते देण्याच्या बदल्यात रोख रक्कमही मिळत असे. चौथे उत्पादन होते केस, जे होळीच्या वेळेस एकदा कापले जात असत. पण चरण्याची सोय दिवसेंदिवस कठीण होत चालली होती व हे एक कारण होते ज्यामुळे रायकांनी उंटांचे प्रजनन करणे सोडले होते. काहींनी आपले उंट विकून टाकले होते तर काहींनी दुसऱ्याला सांभाळयाला दिले होते. वीस उंटांना चरायला द्यायचे शुल्क ३०००रु वर्षाला होते. नवजात वासरांना विकून त्यांचे पैसे मालकाला द्यायची त्यांची जबाबदारी होती.
एक दिवस पशुंच्या हॅास्पिलमध्ये बसून त्यांनी रायकांचे उंट प्रजजनांतून येणारे ऊत्पन्न मोजले. मुख्य उत्पन्न तरुण उंटांच्या विक्रीतून होते. समजा रायकांकडे बारा प्रजननासाठी मादी उंट असतील आणि प्रत्येक दुसऱ्या वर्षी मादी गरोदर राहत असल्या तर कुठच्याही एका वर्षी त्यांतील सहा जणींना पिल्ले होतील . त्यांतील पन्नास टक्के नर असतील तर दरवर्षी तीन तरुण उंट विकायला असतील. त्यांची किंमत हजार ते तीन हजारामध्ये असेल. याप्रमाणे वर्षाचे उत्पन्न तीन ते नऊ हजारामध्ये असेल. पण आपण असे धरून चाललो की, यांत कुठच्याही प्रकारचे नुकसान त्यांच्या गर्भपाताने अथवा वासराच्या मृत्यूने असणार नाही.
अर्थात थोडी जास्त मिळकत उंटांचे शेण विकून व इतर काहीजणांच्या उंटांचे कळप पाळून होऊ शकते. पण इतरही खर्च होते. मुख्यतः जंगलांत चरण्यासाठी लावलेले शुल्क. हे फारसे फायद्याचे नाही. ईल्स म्हणते, “तिला उंट आवडतात पण, आर्थिक दृष्टिकोनातून याला काही अर्थ रहात नाही व ते इतर काही कामाकडे का वळत नाहीत?” मुद्दामून थोडी प्रक्षोभक होऊन विचारते. विनय व डॅा. देवाराम दोघांनीही धक्का बसतो व ते सांगतात, की तिने हे समजून घ्यायला हवे की उंटांचे प्रजनन करणे ही त्यांची परंपरा आहे. डॅा. देवाराम त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतो, की हे रायकांचे कर्तव्य आहे. ते, ते एकदम सोडू शकत नाहीत. मग विनय तिला रायकांच्या मुळा विषयी गोष्ट माहित नाही का? असं विचारतो व सर्व गोष्ट परत सांगतो. “पहिला रायका सुमार हा शिवाने (शंकराने) पहिल्या उंटाची काळजी धेण्यासाठीं तयार केला. शिवा ध्यान करत होता. देवी पार्वती कंटाळली. वेळ घालवण्यासाठी ती मातीचे प्राणी बनवत होती . तिने एक पाच पाय असलेला विचित्र प्राणी बनवला व शिवाला त्याच्यात जीव घालयला सांगितला . शिवाने प्रथम नकार दिला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, पाच पायाच्या जनावराला खूप अडचणी येतील. पण पार्वतीने खूप विनवण्या केल्या . शिवाने त्याच्यात जीव घातला व म्हणाला, ‘उठ’ , तो प्राणी उठला पण त्याला खूप अडचणी होत्या. म्हणून शिवाने त्याचा पाय दुमडून पाठीवर ठेवला. ते कुबड तयार झाले. मग पार्वतीने त्याची काळजी घ्यायला एक माणूस तयार करायला सांगितला . नंदीने त्याच्या घामापासून , धूळी पासून पहिला रायका तयार केला.” विनय तिच्याकडे थोडा कठोर दष्टीने बघून सांगतो की, त्यांचे धार्मिक कायदे कानून त्यांना दूध विकण्यास मनाई करते. विनय तिला सांगतो की तिने डॅा. देवाराम कडून ऐकले असेल की, त्यांच्यामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे . ‘दूध विकले, मुलगा विकला’ म्हणजेच दुधाची विक्रीही मुलांना विकण्या बरोबर समजली जाते. जास्तीचे दूध विकण्या ऐवजी फुकट वाटले पाहिजे. असे मानतात. ही वर्ज्य समजलेली गोष्ट ज्यांनी केली त्यांच्या विषयी अनेक कहाण्या सांगितल्या गेल्या. एकतर पूर्ण उंटांचा कळप मेला किंवा त्या कुटुंबातील सदस्य अचानकपणे दगावले.
विनय तिला पुढे म्हणाला की तू बिकानेरमध्ये बरोबर निरीक्षण केले आहेस की, “उंटाच्या दुधावर प्रक्रिया केली जात नाही. उंटाचे दूध नेहमी ताजे प्यायले जाते. बाकीच्या जनावरांच्या दुधासारखे आधी न तापवता. पण ते चहासांठीं व खीर करायला वापरता येते.” इल्सला ही गोष्ट आकर्षक जरूर वाटते पण, तिला हे अविश्वसनीय वाटते. पैशांच्या जोरावर चालणाऱ्या या जगांत फक्त कोणी कर्तव्यापोटी व धार्मिक किंवा अधार्मिक म्हणून गोष्टी करेल का? तिला हा विचार पटला नाही. ती त्याबद्दल साशंक असते. रायका उंटांचा उपयोग ठराविक पद्धतीने करतात त्याला काही ऐतिहासिक किंवा पर्र्यावरणीय कारणे असावीत. ऱ्कदांचित त्यांनी हिंदू गाई संबंधीचा पूज्यभाव त्यांच्या जवळच्या जनावरामध्ये पाहिला असणार. तिने विचार केला , की भारतातील मुसलमानाचे उंटांशी कसे संबंध असतील हे जाणणे गरजेचे आहे. त्यांच्या उंटा विषयी रायकां सारख्याच भावना होत्या की, जास्त संधीसाधू भावना होत्या व ते उंटापासून शक्य असणाऱ्या सर्व उत्पादनांचा अरबांसारखा उपयोग करत ? तिला असे वाटते की, उंटाच्या दुधावर प्रक्रिया करण्याविषयी असलेली बंदी किंवा मनाईला सुद्धा काहीतरी तर्कशुद्ध कारण असू शकते. उंटाचे दूध दही, चीज किंवा लोणी बनवणे फार कठीण आहे. प्रथिनांच्या संरचनेशी त्याचा काहीतरी संबंध होता, असे तिला अस्पष्टपणे आठवते. तरीही, पुढच्या काही दिवसात तिने रायकांच्या वृत्ती आणि भावनांकडे जास्त लक्ष ठेवले. आतापर्यंत तिची आवड अधिक तांत्रिक बाबींवर, कळपाची रचना, व्यवस्थापन आणि त्याचा ऊपयोगाची पद्धत यावर होती, आता तिने कान उघडे ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक लांब पांढरी दाढी असलेल्या हरजीराम नावाचा रायकाने आणखी कांही सूचना दिल्या सर्व गोद्वार मध्ये एका अतिशय चांगल्या स्थावर मालमत्ता असलेल्या जागेवर त्याची झोपडी एका खडकाच्या माथ्यावर होती जिथून दक्षिणेकडे पसरलेली आरवलीची रांग तसेच उत्तरेला मारवाडच्या मैदानाचे भव्य दृश्य होते . त्याची पत्नी मरण पावली होती, त्याच्या चार मुलींची लग्ने झाली होती . एकुलता एक मुलगा मुंबईत कामाला होता. वयाने आणि अफूच्या व्यसनामुळे तो अपंग असला तरी हरजीराम आपल्या उंटांची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तो एक दयाळू यजमान होता आणि त्याच्या भावाची बायको झोपडीत चहा बनवत असताना, त्याने त्याच्या धोतराच्या ओच्यातून एक लहान आणि सुरकुतलेली प्लास्टिकची पिशवी काढली आणि काही चिकट, मटारच्या आकाराचे तुकडे काढले व त्यांना देऊ केले. “ही अफू आहे हे डॉ. देवराम यांनी स्पष्ट केले. ती देणे हा रायकांच्या आदरातिथ्याचा, संस्काराचा एक भाग आहे. थोडीशी घेतल्याने काहीही नुकसान होणार नाही,” त्यांनी प्रोत्साहित केले आणि नंतर नमस्ते करण्यासाठी हात जोडून अफू खाण्याचा योग्य शिष्टाचार दाखवला, देवीला नमस्कार करून (“आई माताजी”, डोके मागे झुकवून , डावा हात डब्यात ठेवून, आणि नंतर जिभेच्या मागील बाजूस तुकडा ठेवला व गिळला चारपाईवर बसून त्यांनी आजूबजूच्या देखाव्याचा आनंद घेतला आणि ते चरण्याच्या समस्या, दुष्काळ आणि रोगांबद्दल बोलले . हजिरामला असेही वाटले की अलिकडच्या वर्षांत रोगांचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचे कारण देवता क्रोधित होऊन समाजाला शिक्षा देत आहेत. राईका समाजावर राग आहे कारण ते मादी जनावरे विकत आहेत. पूर्वी, ते असे कधीच करत नव्हते परंतु आता मादी मेंढ्या विकण्याचा सराव केला जात आहे आणि आता मादी उंटही बाहेरच्या समाजांतील लोकांनाही विकले जात आहेत. हे त्यांना कुठे घेऊन जाईल? त्यांच्या मादी प्राण्यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला हवे . देव आम्हाला रोग आणि दुष्काळ पाठवून शिक्षा करत आहे .” तो चिडून पुढे म्हणाला. माझा मुलगा, घिसूलाल, मुंबईत काम करतो; दगड -कापायचे .तो पैसे कमावतो आणि काही त्याला पाठवतो. पण आता मी या उंटांचे काय करणार? मी आता म्हातारा व दुर्बल झालो आहे व प्रत्येक दिवश जीवन कठीण होत चालले आहे. ” तो म्हणतो.
त्याचे हे नैराशाजनक विचार त्याच्या भाभीने पितळ्याच्या किटलीतून आणलेल्या चहा व तीन कप बशामुळे मध्येच थांबतात. नंतर तो इल्सला सांगतो की त्याचे काही उंट मॅनगेने आजारी असतात. तो इल्सला त्यांच्याकडे बघायला सांगतो व काय करता येईल विचारतो. हाजीरामच्या आठ माद्या उंट अतिशय वाईट अवस्थेत असतात.).
काहीजणांच्या अंगावर खाजवल्यामुळे थोडेफारही केस शिल्लक नव्हते. डॅा. देवारामने काळजीने त्याचे डोके हलवले. तो म्हणाला , “हे अतिशय वाईट आहे व पूर्ण कळपाला याची लागण, तरुण उंटासकट होऊ शकते.” त्या उंटांवर लगेचच उपाय करायची गरज असते. त्यांचे पूर्ण शरीर कीटकनाशकाने चोळायला हवे किंवा वापरलेल्या इंजीन ॲाइलने. पण हे खूप जास्तीचे काम असते एकटा हाजीराम ते करू शकला नसता. थोड्या दिवसांच्या अवधीत तिला दोनदा तिचे पशुवैद्यकीय ज्ञान विसरल्या बद्दल पश्चात्ताप होतो. पण सुदैवाने डॅा.देवारामला मॅनगेच्या औषधव्यवस्थे विषयी सर्वकाहीं माहित असते. त्वचेचा रोग( बाधा ) जो लहान किड्यांनी होतो व ते त्वचेत घुसतात. हा टीबुरसा खेरीज उंटाना होणारा मोठा रोग आहे. यासाठी अनेक ऊपाय आहेत. पुर्वापार वापरांत असलेली व स्थानिक पातळींवर बनवलेली तेल,किंवा व्यावसाईक रीतिने बनववलेली किटकनाशिके . त्यासर्वांमध्ये पूर्ण उंटाला बुडवून किंवा ते उंटाच्या अंगाला जोरांत चोळण्याची गरज असते. उंटाच्याशरीराचा पृष्टभाग खूप मोठा असतो.
शेवटी, जरी ती उंटांनां बघण्याने , त्यांच्या संबंधी माहिती मिळविण्याने व रायकांशी संबंध जोडण्याने ती उत्तेजित व आनंदी झाली होती तरी तिला असे वाटते की,वैद्यकीयदृष्ट्या अलिप्त राहून संशोधन शक्य नाही. उंट वन्यजीव नाहीत की ज्यांचे ती दूरवर आणि तटस्थपणे निरीक्षण करू शकते, आणि ज्यांच्यापासून तिची संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर ती स्वतःला त्यांच्या पासून वेगळे करू शकेल. ते त्यांच्या धन्याबरोबर आले आणि तिने प्रश्न विचारयाला सुरवात केल्यावर त्यांच्याशी एक नाते निर्माण झाले .नात्याशिवाय, कोणीही तुम्हाला फारशी माहिती सांगणार नाही. जोपर्यंत लोकांना वाटत नाही की तुम्ही निष्ठावान समर्पित आहात व तुम्ही त्यांच्या उंटा विषयी व त्याच्या विषयी आस्था व काळजी बाळगता, तोपर्यंत ते तुम्हांला माहिती देणार नाहीत हा धडा ती बिकानेर येथे शिकली. गोदवार येथे लोक बोलते झाले कारण डॉ. देवराम त्यांच्या समुदायातील होता आणि त्यांने लोकांच्या समस्यामध्ये रस घेतला होता त्यामुळे त्याच्या पशुवैद्यकीय ज्ञानाला खूप मागणी होती. एकत्र बसल्याशिवाय संशोधन शक्य नव्हते, चहाचे भरपूर कप प्यायले नाहीत, पाहुणचार स्वीकारले नाहीत तर लोकांच्या मनात काय आहे हे सांगण्याचा पुरेसा आत्मविश्वास निर्माण होत नाही. विशेषत: चहा घेणे एक प्रकारची कसोटी किंवा परीक्षा होती . (Acid test) हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी तिथे आला नव्हता व, तुम्ही लोकांना व त्यांच्या स्वत: च्या अधिकारांना महत्त्व देता. आणि स्थानिक प्रमाणा प्रमाणे (नियमा प्रमाणे) त्यांच्याशी जोडलेले आहात.
नातेसंबंध आणि ज्ञानामुळे जबाबदारी आली. त्यावेळेस तिला खात्री नव्हती की त्यानंतर कुठला पेचप्रसंग येईल याची तिला जाणीव मव्हती. कारण तिच्यावर इतरही जबाबदाऱ्या होत्या: तिचे कुटुंब गॅरी, जोन आणि आयशा राजस्थानला भेटायला येत होते.
