Camel Karma – Chapter 2 – बिकानेर

मारवाडमध्ये रबारींना रायका असेही म्हणतात. ते लोकसंख्येच्या3.5 % एवढे आहेत. ते उंटांचे खरे प्रजनक आहेत. ते ठामपणे सांगतात की , त्यांचा पहिला पूर्वज महादेवाने पहिल्या उंटाची काळजी घेण्यासाठी निर्माण केला जो पार्वतीने स्वतःच्या करमुणीकीसाठी तयार केला होता.
( राजस्थांन गॅझेट १९०८ )o
नोव्हेंबर १९९०
दहा लाखांच्यावर उंट असलेल्या, जगात तिसऱ्या नंबरची उंटांची लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशांत इल्स संशोधन करायला येते.
ती उंटपालन व त्यांचे आर्थिक व सामाजिक व्यवस्थापन यावर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करते , तो स्वीकारला जातो.
या विषयावर फारसे संशोधन झालेले नव्हते. तिच्यातुटपुंज्या माहिती प्रमाणे भारतातील उंटपालन हे शेतांतील लागवडीसाठीसुद्धा चांगल्या प्रकारे जोडले गेले होते आणि केवळ भटक्या जमातीच नाही तर , शेतकरी देखील उंट पालन करत. तिने प्रस्तावात हा मुद्दा वापरून असा युक्तिवाद केला होता की भारतीय उंटांची परिस्थिती केवळ अभ्यास करण्यासाठी नाही तर , आफ्रिकन देशांसाठी सुद्धा उपयुक्त धडे देऊ शकते. तिचा अर्ज स्वीकारला गेला व तिला तिचे संशोधन बिकानेर येथील, देशाची मुख्य रिसर्च इंस्टिटूट NRCC -National research Council for Camels यांच्या मार्गदर्शनाखाली करायची परवानगी मिळते. सुदैवाने गॅरीला पुणे येथील डेक्कन कॅालेजमध्ये संशोधन करण्यासाठी फुलब्राईट फेलोशिप मिळते, म्हणून त्यांचे कुटुंब पुण्यात घर करते व तिच्या मुलांना तेथील स्थानिक शाळेत प्रवेश मिळतो. पुण्याहून राजस्थानला यायचा तिचा विचार असतो. तिच्या क्षेत्रिय कार्यासाठी ( field work ) प्रत्यक्ष अनुभवासाठी तिने, भारतीय उंट पालकांबद्दलच्या माहितीसाठी सर्व उपलब्ध स्त्रोत परिश्रमपूर्वक शोधले. अरबी बदाउनी आणि आफ्रिकन संस्कृतीशी साम्य शोधायचा ती प्रयत्न करते. तिने तुरेग,सोमाली, बदाउनी व रेन्डिले यांच्या विषयी भरपूर वाचलेले असते. हा तर्कशुद्ध निष्कर्ष होता की भारतात परंपरागत उंट प्रजनन करणारे व उंट पालक असणार, कारण भारतात धंदे पिढीजात असतात व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातीद्वारे हस्तांतरित केले जातात. पण भारतीय उंटासंबंधीचे साहित्य या विषयावर काहीही भाष्य करत नाही. ती अनेक आहवाल, ग्रंथ पडताळते. यामधून उंटांची शारीरिक शास्त्रीय माहिती असते.पण एकाही अहवालांत तिला उंट पालनाविषयी , त्यांचा सांस्कृतिक पाया , व्यावहारिक बाजू , उंटांची पैदास कशी केली गेली, त्यांचा वापर कसा होत असे हे समजत नाही. त्यांचे सामाजिक व आर्थिक महत्व हे पुष्कळशा साहित्यातून , लेखांतून पुरेसे स्पष्ट नव्हते. फक्त एका संदर्भ ग्रंथात, लेखात तिला राजांच्या वेळेपासून जे उंट पालन करीत त्या रायकाविषयी थोडी माहिती मिळते.
महादेव व पार्वती यांचा संदर्भ तिला फारसा व्यावहारिक व फायद्याचा वाटला नाही व तिने भारतीय संस्कृतीचा अभ्यासही केलेला नसतो.
बिकानेरच्या सीमा रेषेवर असलेले NRCC सेंटर अतिशय प्रभावी व आकर्षक असते. पण बिकानेर शहर खूप लांब व अविकसित असते. तेथे जाण्यासाठी रेल्वे व विमानाचे आरक्षण मिळवायला तिला अनेक महिने लागतात.
शेवटी एका नोव्हेंबरच्या थंडीतल्या सकाळी ती बिकानेरला पोहोचते. रेल्वेस्टेशनपासून तिच्या हॅाटेलपर्यंत जायला फक्त घोड्याचा टांगा हे वाहन असते. पण संशोधन केन्द्राची अतिशय प्रभावी मांडणी असते. ते सायन्स व तंत्रज्ञान यांचे मंदिर असते. हे रक्त विश्लेषण करण्यासाठी, जीवरसायनशास्त्रातील मापदंड आणि हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी आणि तणाव घटकांचे मोजमाप करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि तांत्रिक उपकरणे विस्तृत प्रयोगशाळेने परिपूर्ण होते. तेथे एक पाचशे उंटांचं शेत असते. त्यांत भारतातील अनेक मात्तब्बर जातींचे उंट प्रतिनिधीत्व करतात. लांब गुंडाळलेल्या कानांचे बिकानेरी, चपळ जैसलमेरी दुधाचा चांगला पुरवठा देणारे पण मंद व सुस्त गुजरातमधील कच्छ मध्ये, ईमरेटस मधून आलेला उंट या सर्वांचे कुबड ( hump ) चांगले होते कारण त्यांना पौष्टिक अन्नावर वाढवले जात असणार. तेथे कृत्रिम गर्भधारणा व गर्भ प्रत्यारोपण होत असते.
डायरेक्टर डॅा. खन्ना तिचे मनापासून स्वागत करतात. तिला संपूर्ण केन्द्र दाखवतात व तिने रायका व त्यांचे उंट पाहाण्याची ईच्छा दर्शवल्यावर दुसऱ्या दिवशी एक जीप व पशुवैद्य अनुवादासाठी देतात. ती गधवाला खेड्यात जाते ते बिकानेरपासून काही कि. मी. अंतरावर असते.
बिकानेरचा आजूबाजूचा प्रदेश वाळूच्या महासागराने भरला होता व रस्त्यावर वाळू वरखाली हेलकावे खात होती. अनेक वाळूचे ढिगाऱे त्यांनी चुकविले लाटांचा सामना करणाऱ्या ट्रॉलरप्रमाणे जीपने वाळूचा सामना केला. अनेक वाळूंचे डोंगर त्यांनी पार केले. जरी जिकडे तिकडे झाडे आणि पशुधन ठिपक्याप्रमाणे पसरले होते तरी , ती वाळू म्हणजे बधण्यास असमर्थ करणार पांढरा शुभ्र रंग होता व मातीच्या-विटांच्या घरांच्या स्वच्छ व निर्मळ वाड्यांमध्ये विखुरलेली होती. पांढऱ्या आणि गेरूमधील या ग्रामीण रंग संगतीतील बहुतेक रंग स्त्रियांच्या पोषाखाशी जोडले गेले होते. त्यांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे कौशल्याने सांभाळत इतर कामास जात होत्या
जीप एका पारंपरिक कंपाऊंडला वेढलेल्या मातीच्या भिंतीजवळ उभी राहिली. ते घर रायकाचे होते ज्याच्या नातेवाईकाने NRCC मध्ये काम केले होते . त्यांनी प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच, चारपाईवर डुलकी घेत असलेला एक माणूस घाईघाईने उठला, त्याने पगडी घातली, त्याचे धोतर सारखे केले, आपल्या मोठ्या पांढऱ्या मिशावर परत हात फिरवीत “राम राम” म्हणून त्यांचे स्वागत केले. उंटांच्या मोठ्या कळपाचा मालक कनाराम अशी त्याची ओळख करून दिली. त्याच्या झोपडीचे आवार अतिशय स्वच्छ असते. नीट झाडलेल्या अंगणात आणखी दोन चारपाई आणल्या गेल्या. जरी ते आगांतुकपणे आले होते तरी कुठेही वाळूचे कणही नव्हते. तुटलेली भांडी, इतर पसारा नव्हता.सगळं काही संग्रहालयांत असल्या सारखे व्यवस्थित होते. . कनाराम व
त्याचे दोन भाऊ मिळून त्यांच्यांकडे तीनशे उंट असतात. पण त्यांच्या उंटांचे कळप वीस कि.मी. वर मुक्त फिरत असतात. हे उंट फक्त पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीवर येतात. फक्त पावसाळ्यांत त्यांना एकत्र केले जाते कारण तेव्हां शेतामध्ये शेती केली जाते. ते चोरीलाही जात नाहीत , कारण त्यांच्यावर त्यांच्या गावाचा शिक्का असतो. एखादे जनावर हरवले तर त्याच्या पायाच्या ठशांवरून त्याला ओळखतात. अशा लोकांना पगरी म्हणतात.
त्यांच्या उंटापैकी ऐंशी टक्के मादी उंट होत्या.
त्यांनी नवजात नरांना जन्म दिला की ते पुष्करच्या मेळ्यांत विकतात.
“उंटांच्या दुधाचा उपयोग नाही का करत?”असे विचारल्यावर कनाराम सांगते की हे उंट. लांब भटकत असतात . त्यामुळे दुधाचा ऊपयोग होत नाही व दुधासांठी त्याच्याकडे गाई म्हशी असतात. “त्त्यांच्या मासाचे काय करतात? ” असे विचारल्यावर तो डॅाक्टर म्हणतो की , “हा प्रश्न चांगला नाही. कारण उंटाचे मास हे
लोक खात नाहीत कारण ते हिंदू आहेत . हा प्रश्न विचारू नका. उंटांविषयी त्यांच्या भावना खूप उत्कट आहेत.”
कनाराम सांगतो की पूर्वी लग्नांत हुंडा म्हणून उंटांना द्यायची पद्धत होती पण आता ती कोणी पाळत नाही. त्याच्या लग्नांत त्याला एकवीस माद्या व एक नर हुंडा म्हणून मिळालेला असतो.
गधवालाचे रायका बिकानेरच्या महाराजांच्या उंटांचे पालन करत.
नंतरच्या काही दिवसांत ती आणखी रायकांच्या वस्त्यांना भेट देते. त्यापैकी एक नोख (Nokh ) नावाचे गांव असते. त्या गांवातील रायका तिला सांगतो की, त्यांच्या पुर्वजांनी जयसलमेरच्या महाराजांचे उंट सांभाळले होते. पण तिला रायकांच्या खूप वस्त्या दिसत नाहीत. तिल असेही समजले की, मुस्लिम जमातीला उंटा विषयी खास आकर्षण आहे. ते उंटांचे दूध तीन वेळा काढतात , त्यांच्या शर्यती लावतात व त्यांना नाचायला व नमन करायला शिकवतात.
तिची उत्सुकता खूप शिगेला पोहोचते .
ती पहिल्यादांच ऐकते की , उंटपालक त्याच्या मासाचा उपयोग करत नाहीत. इजिप्तमध्ये उंटाचे मास स्वस्त असल्यामुळे गरीब लोक त्याला प्राधान्य देतात, हजारांनी उंट तेथे सुदानमधून ,”चाळीस दिवसाच्या”,रस्त्यावरून येतात,जगांतील सर्व उंट पालक त्यांच्या मासाचा उपयोग करतात.
रायका उंटांचा वापर कसा करतात त्याचे साधारण चित्र तयार होते. उंटांचा ऊपयोग त्याच्या दुधासांठी फारसा करत नाहीत. जर त्यांच्याकडे गाय, म्हैस नसेल तरच करत. त्याचे मास खाणे निषिद्ध समजतात. त्याचा उपयोग वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र करतात. उंटांच्या लोकरीचा ऊपयोग ब्लॅकेटस् , रजया व दोऱ्या करण्यासाठी करतात. त्याच्या शेणांत वाळू मिसळून सुंदर भिंती तयार करण्यासाठी वापरत. त्यांच्या हाडांचा ऊपयोग खतांसाठी व चामडीचा उपयोग वेगवेगळ्या आकारांची भांडी करण्यासाठी करत. पण रायका फक्त उंटांचे पालन व प्रजनन करतात.
उंटांचा वाहतुकीसाठी केला जाणारा मोठा उपयोग बिकानेरमध्ये व त्याच्या आजूबाजूला दिसून येत होता. दोनचाकी व चारचाकी उंटांनी जोडलेल्या गाड्या हे सर्वव्यापी दृष्य
गजबजलेल्या बाजाराच्या ठिकाणी होते. जवळ जवळ सर्वच गोष्टी उंटांच्या गाड्यांवर वाहून नेल्या जात होत्या. लाकूडफाटा, गॅस सिलींडर, विटा,चारा, कापडाचे गठ्ठे , लोकर व माणसे.
तिला खूप आश्चर्य वाटले की , उंटांचा उपयोग अन्नासाठी का करत नााहीत जो उंट पाळण्याचा इतर ठिकाणी मुख्य उद्देश असतो तो पूर्णपणे दुर्लक्षित होता. ती विविध पर्यायांचा विचार करते. कदाचित रायका हिंदू असल्यामुळे आणि त्यांनी त्यांच्या जवळचा प्राणी उंटात ही पवित्र गाईची कल्पना पाहिली असावी. की ते शाकाहारी होते आणि मांस वगैरे खात नव्हते म्हणून . एखादे ऐतिहासिक स्पष्टीकरण किंवा पर्यावरणीय कारण होते का? शिवाय, प्रजनन पद्धतीचे अर्थशास्त्र काय होते? रायका त्यांच्या कळपातून चांगली कमाई करत का? कळपाचा सरासरी आकार केवढा होता? ते दरवर्षी किती उंट विकायचे आणि काय फायदा मिळवायचे?
तिने परत NRCC च्या लायब्ररीत उत्तरे शोधायचा प्रयत्न केला. उंटांवरचे खूपसे साहित्य तांत्रिक व निवडक होते. राजपुतानाच्या आधुनिक पुनमुद्रणाच्या गॅझेटसच्या एका मारवाड राज्याच्या खंडामध्ये तिला एक उंटांचे लष्करी महत्व सांगणारी नोंद मिळते.
“प्राचीन काळापासून या राज्यात, राज्य उंट तोलाची देखभाल करण्यासाठी एक पद्धत प्रचलित आहे , जुन्या दिवसांप्रमाणे इतर वाहतुकीच्या साधनांच्या अभावी उंट मोठ्या संख्येने ठेवणे आवश्यक होते. ” राज्याचा उंटांचा तोला ( उंटांचा कळप )रायकाकडे असे. ज्यांना राज्याच्या पडीक जमीनीवर चरण्याची परवानगी होती. त्या नोंदीमुळे हे निश्चित होते की, रायकाकडे राजाच्या उंटाची काळजी घेण्याचा वारसा होता.
. १८८९ ते १८९३ मध्ये बिकानेरच्या गंगासिंग महाराजांनी ५०० उंटांच्या मजबुत सैन्याची तुकडी , “गंगा रिसाला” स्थापन केली होती. गंगा सिंग, एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ब्रिटिश युद्ध मंत्रिमंडळात भारताचे प्रतिनिधीत्व केले.
नंतर संध्याकाळी ती गावातून हिंडते. गंगासिंगचा बिकानेरच्या वास्तुकलेवरही ठसा उमटलेला असतो. त्याने केलेली गावाची रचना पुरोगामी व भव्य असते. तिथे योजनाबद्ध मार्ग, सर्कल्स, गावात उद्यान व प्राणी संग्रालय असते. आणि हा भाग आता जवळजवळ रहदारी रहित होता. मधोमध किंचित दूर असा भव्य जुनागड किल्ला होता, आतमध्ये मोठे आणि भव्यपणे सजवलेल्या महाल किंवा राजवाड्यांचा समूह होता. लाल सँडस्टोनपासून बनवलेल्या भव्य डिझाइनच्या इमारती बिकानेरमधील अनेक अनपेक्षित ठिकाणी ऊंच कळस आणि बुरुजासह उभ्या होत्या . याउलट, शहराचे नवीन भाग एक असंबद्ध आणि गर्दीने भरलेले शहरी गोंधळाने भरलेलेहोते , ज्यामध्ये स्कूटर, टांगा, तीन चाकी रिक्षा आणि उंट-गाड्या होत्या.

तिला तिचे संशोधन निरर्थक व असंबद्ध वाटते कारण तिला कुठेही उंटांचे कळप बघायला मिळत नाहीत. फक्त मधूनच दूर अंतरावर भटकणारे उंट दिसतात. ती बीकानेरमध्ये सगळीकडे उंटांच्या गाड्या, जळाऊ लाकडांनी व सर्व प्रकारच्या सामानाने भरलेल्या बघते. उंटांचे प्रजनन करणारा कळप तिला दिसत नाही . बिकानेरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेतलेला, रायकाच्या रुपांत एक आधारवड भेटतो . त्यांचे नाव डॉ देवाराम देवासी होते आणि ज्यांनी विद्यापीठाचे शिक्षण घेतले होते अशा काही मोजक्या लोकांपैकी तो एक असतो. तो लाजाळू आणि मृदुभाषी असतो . तो मेंढीपालन करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील असतो. त्याचे सर्व भाऊ आणि त्यांची कुटुंबे अजूनही त्यांच्या मेंढरांच्या कळपासह स्थलांतर करत होते. मुळात त्याची शाळेत जाण्याची कोणतीही योजना नव्हती, पण एका शेजाऱ्याने डॉ. देवरामला वर्णमाला शिकवली होती, ज्याचा सराव त्यांने काठीने वाळूत लिहित शाळा आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयातून केला होता. प्रचंड संघर्ष करत, त्याच्या कुटुंबावरही मोठा आर्थिक भार पडतो तरीही, तो इतर विद्यार्थ्यांना दूध विकून शिकतो . शहरांत वाढलेल्या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा स्वभाव खूप वेगळा होता. त्याच्या पार्श्वभूमीमुळे आणि त्याच्या सहानुभूतीमुळे, लोक मोकळेपणाने बोलू लागतात, आणि मुलाखती देतात.

रायका उंटांच्या दुधाचा इतका कमी ऊपयोग का करतात यांचे तो तिला लगेच उत्तर देतो. ” आम्हां रायकांना दूध विकण्यास सांस्कृतिक बंदी आहे. आमच्यासाठी ती देवाची देणगी आहे. आमच्याकडे जास्त दूध असेल तर ते आम्ही वाटून टाकतो. त्यासाठीं पैसे घेत नाही . आमच्या द्रृष्टीने दूध विकणे म्हणजे स्वतःच्या मुलांना विकण्या सारखे आहे . पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्हीं आमच्या मेंढ्याच्या दुधापासून तूप विकायला सुरवात केली आहे. उंटाचे दूध आम्ही ताजे पितो . तापवत नाही व त्यापासून तूप किंवा दही बनवायला आमच्या जातीत बंदी आहे.”
पण दुर्दैवाने डॅा. देवारामचे बिकानेर मधील वास्तव्य संपुष्टांत येते. त्याची राजस्थांन मधील साद्री या छोट्याश्या गावांत बदली होते. तो इल्सला साद्रीला यायचे निमंत्रण देतो.