Camel karma – Chapter 1 – Camel

उंट हा भटक्यांचा पौष्टिक आहार आहे. त्यांचे वाहतुकीचे वाहन आहे. आर्थिक व्यवहाराचे माध्यम आहे. नवऱ्यामुलीचा हुंडा आहे. वाळवंटातील शेखांची सर्व संपत्ती उंटांमध्ये मोजली जाते. तो बदाऊनीचा नेहमीचा सोबती आहे. त्याचा जिगरी दोस्त आहे. त्याचा मानलेला पालक आहे. तो पाण्याऐवजी त्याचे दूध पितो. ( अतिशय दुर्मिळ असलेले पाणी इतर गुरांसाठी ठेवतो. ) तो त्याच्या मांसावर मेजवानी करतो त्याची कातडी पांघरतो. त्याच्या केसांचा तंबु बनवतो. त्याचे शेण इंधन म्हणून वापरतो व त्याची लघवी केसांसाठी व औषध म्हणून वापरतो. उंट हा त्याच्यासाठी अल्लाची देणगी आहे . फक्त वाळवंटातील जहाज नाही.
Philip k. Hitti, History of the Arabs (1970 )
फिलिप के. हित्ती, अरबांचा इतिहास (1970)
March 1979.
ऊंटाविषयी इल्सची तीव्र आवड जॅार्डनमध्ये निर्माण झाली. उत्तरेकडील एका सुंदर वाडीत (हंगामी नदीचे कोरडे पात्र, अरेबिक ) जी जवळच्या जॉर्डन नाल्यात वाहून गेली.
डॅा. कोलर पशुवैद्य असते. ती जॅार्डनमध्ये पुराशास्त्रीय ऊत्खननात जीवशास्त्रीय विश्लेषक म्हणून काम करत होती.
तिला , तिच्या जर्मनीतील पशुवैद्यकीय कामातून बदल हवा असतो.
कृत्रिम रित्या गाईंची गर्भधारणा व डुक्करांच्या पिल्लांचे टेस्टीकल्सकाढून टाकणे या कामाचा तिला कंटाळा आलेला असतो. तिला प्राण्यांची आवड असते. तिला हे उत्खननाचे काम आवडते. त्यांच्या टीममध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण असते. त्यांच्या उत्खननाच्या जागेवरून जॅार्डनची घळ दिसत असते. ७००० वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे ऊत्खनन करण्यांचे त्यांचे काम असते. उत्खननातील प्राण्यांच्या हाडांच्या ढिगाऱ्यातून त्या काळांतील त्यांचे खाणे व आर्थिक स्थितीची माहिती गोळा करायचे काम असते.
त्यांची ही कामांची जागा हिरवीकंच व फुलांनी भरलेल्या घळी जवळ होती . ती आजूबाजूच्या वसहातींसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. इल्स रोज सकाळी गावकऱ्यांना गाढवांच्या पाठीवर पाण्याचे कॅन लादतांना बघत असे.
एके दिवशी कामाच्या जागेवरून रमत, गमत चालत असतांना तिला व्हॅलीच्या दुसऱ्या बाजूला हालचाल दिसते. नीट निरखून पाहिल्यावर तिला असे दिसते की साधारण शंभर एक उंटांचा काफिला एका रांगेत चढावरून चालत असतो. चपळ , बागडणारे मऊ लुसलुशीत बेबी उंट ,त्याच्यां पावलावर चालत असतात. पाणवठ्याजवळ आल्यावर अतिशय विलक्षण, अविश्वसनीय घटना घडते . एकमेकांना ढकलत पुढे येऊन गर्दी करण्या ऐवजी ते ५ ,५ च्या रांगेत पाणी पिण्यासाठीं पुढे येतात मागचे उंट आपली पाळी येईपर्यंत संयमाने व त्यांचा उंटपालक त्यांना खुणेने व आवाजाने बोलावेपर्यंत शांतपणे ऊभे राहतात. त्यांचा हा शिस्तबध्दपणा पाहून ती अतिशय आश्चर्यचकित होते. उंटांचा आज्ञाधारकपणा , एवढ्या मोठ्या बलवान प्राण्यांच्या मोठ्या कळपावर फक्त एका व्यक्तीचे नियंत्रण , त्यांच्या बछड्यांचे आलिंगन, बागडणे, वातावरणातील गुढता, पूर्वेकडील सुगंध या सर्वांने ती खूप भारावून जाते . तिच्यातील एक सुप्त आंतरिक शक्ती तिला उंटपालकाला भेटायला प्रोत्साहित करते. आपल्या तोडक्या मोडक्या अरब शब्द समुहाने ती उंटपालकाला सांगते की त्याच्या कळपाने मंत्रमुग्ध झाली आहे.
त्या (bedouin ) बदाउनी उंटपालकाचे नाव अबु जुमा असते व त्याच्या बायकोचे नाव उम जुमा असते. तो तिला आपल्या शेळीच्या केसाने बनवलेल्या तंबूत चहाचे आमंत्रण देतो.
ते तिला आग्रहाने अनेक ग्लासेस मिंटचा चहा पाजतात. इल्स तिच्याशी व तिच्या फाटक्यातुटक्या कपड्यांतील मुलांशी मैत्री करते. ते अतिशय आनंदी कुटुंब असते . ते इल्सशी हसून खेळून गप्पा मारतात व विनोद करतात. त्यांची संपत्ती म्हणजे दोन फोमच्यागाद्या, काहीं स्वयंपाकाची साधने व तो तंबु. उंट हीच त्यांची खरी संपत्ती असते. एवढे ऊंट ते कशीसाठी पाळतांत ते तिला ऱ्समजत नाही.
तिला जेव्हां जेव्हां वेळ मिळेल तेव्हां ती उत्खननाच्या जागेवरून निसटून येथे येते व त्यांच्यात मिसळते. तो वसंतऋतू होता त्यामुळे कुरण डॅडेंलियॅानच्या फुलांनी फुललेले असते. मादी उंटांना त्यांची नाके गच्च हिरव्या चाऱ्यात खुपसतांना , त्यांच्या आवडत्या हिरव्या खाद्यने पोट भरताना पाहून तिला खूप समाधान आणि शांती मिळते. उंटांचे बछडे त्यांच्या खांबासारख्या पायांवर शिवाशिवी खेळतांना, त्यांचा आजूबाजूचा प्रदेश न्याहाळतांना, व मधूनच त्यांच्या आईकडे संरक्षणासाठी धाव घेतांना बघण्यांत तिने तासनतास घालवले असतात.
अबु जुमा खऱ्याअर्थाने त्यांचा पालक असतो.तो हे पाहतो की त्याचे उंट जास्तीत जास्त वेळ हंगामी हिरव्या कुरणांवर चरण्यांत घालवतात. त्तो दिवसभर त्यांच्याबरोबर राहतो. गाणी म्हणतो. त्या उंटांवर कसलीच सक्ती नसते.
माणूस व जनावर याच्यातील सुंदर नाते ती बघते. पण लौकरच ते कुटुंब तेथून तंबू गुंडाळून निघून जाते. त्यानंतर ऊत्खननाचे काम संपल्यावर जॅार्डनच्या प्रवासातून तिला खूप उंट दिसत नाहीत. जणूकाही हे सर्व एक सुंदर काल्पनिक चित्र होते.
तिच्या देशांतील प्राण्याना वाढविण्याची पध्दत व या पद्धतीत खूपच फरक तिला जाणवतो. जर्मनीत नुकत्याच जन्माला आलेल्या वासरांना लाकडी खोक्यांत ठेवले जात असे व आईपासून वेगळे करून दुधाच्या पावडरवर वाढवले जात असे.
तिला प्राण्यांची आवड असते मुख्यतः घोड्यांची, पण तिचा भ्रम निरास होतो. प्राण्याची किमंत त्यांच्या ऊपयुक्ततेवर ठरवली जात असे. पशुवैद्य म्हणून तिचे काम प्राण्यांच्या मदतीसाठी नसते तर त्यांचे मालक जास्तीत जास्त फायदा कसा मिळवतील हे बघण्यासाठी असते . दोनवर्षाच्या तरुण घोड्यांना निर्दयपणे रेसकोर्सवर इतके पळवले जात असे की त्यांची हाडे व स्नायू निकामी होत असत. मग कत्तलखाना हा एकच पर्याय राहत असे.
धरी परत गेल्यावर उंटांवर जेवढे म्हणून वाचता येईल तेवढे ती वाचते. अरेबियांत प्रवास केलेल्या प्रवाश्यांचे चित्तवेधक खंड ती वाचते. त्यांनी वर्णन केल्या प्रमाणे उंट हे बदाऊनी समुदायाच्या सर्व सामाजिक व भौतिक गरजा पुऱ्या करतात. म्हणूनच त्यांची संस्कृति उंटांना अल्लाची देणगी समजते. उंटांचाअरेबिक शब्द जमाल ( jamal ) म्हणजे सुंदर .
तिला हे समजते की फक्त बदाऊनी यांच्याच संस्कृतीचे उंटांशी भावनिक बंध नाहीत . उत्तर आफ्रिकेचे तुरेग ( Tuareg ), यांना उंट म्हणजे प्रेमाचे प्रतिक , ईथोपियांतील ‘अफर ‘ जमात उंटाचा मृत्यू, त्यांच्या मुलाच्या मृत्यूपेक्षा महत्वाचा समजतात , कारण उंटाशिवाय त्यांचे अस्तित्व राहणार नाही. केनियातील रेनडिले व गाब्रा जमातीतील सर्व विघी उंटा भोवती असतात. उंटांशी अतिशय घट्ट ( संबंध ) बांधिलकी सोमालीच्या लोकांची आहे . त्यांचे विपूल साहित्य उंटा उंटावर आहे.
अरेबियातील अनेक प्रसिद्ध संशोधक वाळवंटातील लोकांचा उंटाबद्दलचा स्नेह आणि त्यांची प्रवासवर्णने या प्रजातीच्या गुणांना अमर करतात. नशिबाने किंवा निवडीमुळे जगाच्या उष्ण आणि कोरड्या भागात राहण्यास भाग पाडलेल्या सर्व लोकांसाठी स्वर्गातून पाठवलेला प्राणी म्हणून ते त्याचे वर्णन करतात .
खरं तर, उंटाशिवाय, बदाउनी वाळवंटात राहू शकत नाहीत व हे भाग उंटाशिवाय राहण्यास योग्य नाहीत. कारण उंट काटेरी, तंतुमय आणि खारट वनस्पतींच्या आहारावर पोसले जातात . उंट वाळवंटातील अन्यथा निरुपयोगी वनस्पतींचे अत्यंत पौष्टिक अन्न आणि उर्जेच्या इतर प्रकारांमध्ये रूपांतर करतात. अत्तिशय तुटपुंज्या व विखुरलेल्या संसाधनांने उंट मोठ्या प्रमाणात दुध हेच मुख्य अन्न व फक्त अन्न वर्षभर उत्पादन करण्यास सक्षम असतात. मास, लोकर व शेण ही दुय्यम उत्पादने ( by products ) आहेत.
उंट हे एक परिपूर्ण यंत्र आहे जे वाळवंटाचा उपयोग करण्यासाठी बनवलेले आहे . ते अनेक प्रकारे पाण्याची बचतकरण्याच्या यंत्रणांनी सुसज्ज आहे . उंटाचे शारीरिक तपमान कायम नसते. तर तो सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे किंवा थंड रक्ताच्या प्राण्यांप्रमाणे त्याच्या शरीराची ऊष्णता बाहेरील तपमानाशी जुळवून घेतो . उंटाच्या शरीराचे तपमान दिवसाच्या सर्वांत ऊष्ण वेळेस सर्वांत जास्त असते व सकाळच्या थंडवेळी सर्वांत कमी असते. ही एक पाणी वाचवायची चलाख कल्पना आहे. उंटाला फार कमी घाम येतो, त्यामुळेही पाण्याची बचत होते.
इल्स ऊंट व त्याचे पालन ( domestication) यावर प्रबंध लिहीते. तिल बदाउनी व त्यांचे उंट यावर संशोधन करायला परवानगी मिळते ,पण तिला सरकारी परमिट मिळत नाही. त्यांच्यामते आता उंट पाळणारे बदाउनी जास्त राहिले नाहीत व उंट कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे तिला, तिच्या संशोधनातून बाहेर पडावे लागले व ती परत पुरातत्वप्राणी शास्त्रीय संशोधनाकडे वळते.
ती अमेरिकन पुरातत्व संशोधक गॅरी रोलेफ्सन याच्या प्रेमांत पडते. लग्नानंतर तिला जोन व आयेशा ही दोन जुळी मुले होतात. ते
सर्व सॅन दिएगो मध्ये जातात. तिथे गॅरी मानववंशशास्त्राचा प्राध्यापक होतो व ती विद्यार्थ्याना पुरातत्वशास्त्र शिकवते.
प्रोफेसर बक्री मुसा व त्याचे सहकारी यांच्याबरोबर ती पुर्वेकडील वाळवंटात शेकडो मैल प्रवास करते. रशैदा बदाउनी यांची मुलाखात धेते. त्याच्या कळपाची रचना, चाऱ्याच्या वनस्पती, त्याच्या स्थलांतराचे मार्ग प्रचननाच्या पद्धती, आजारांवर पारंपारिक औषधे इ .ची माहिती करून घेते. रशैदा बदाउनी सुदानमध्ये शंभरवर्षापूर्वी सौदीअरेबियातून आलेले असतात व वेगवेगळ्या प्रकारचे उंट विविध कारणांसाठी बाळगतात. त्यांचा स्वतःची, लालसर रंग लहान, बळकट आणि चांगलेदूध देणारीजात असते . ज्यांची वंशावळ सात पिढ्यांमध्ये त्यांना माहित आहे, अशा उंटांसाठी वेगवेगळ्या गल्फ देशातून खूप श्रीमंत लोक येथे उंटांच्या शॅापींगसाठी विमानाने येत असत . तिचा इथला निवास कमी असतो पण अतिशय फलदाई व आनंददायक असतो. तिला तेथे संशोधन करायचे असते पण परवानगी मिळत नाही.
सध्या, ती राजस्थानमध्ये राहते आणि जगभरातील पशुपालक, प्राणी संस्कृती आणि शाश्वत पशुधन पाळण्याबद्दल संशोधन आणि लेखन करत आहे.