अनोख्या सौंदर्याचा फॅाल सिझन

पानगळीने निष्पर्ण होण्याआधी

वृक्षांच्या या रंग महोत्सवाने

उजळतो आसमंत प्रखर तेजाने

दिपवीत  प्रज्वलित अंगाराने

पेटवत भवताल आपल्या मायेने

कोण  किमयागार खेळतो

खेळ रंगपंचमीचा वृक्षांसंगे

हळदीचा पिवळा,केशरी 

लाल तांबडा, रक्तवर्णी

उधळून अनंत हस्ते

  अवाक होते मन पाहून ही 

निसर्ग लीला अगाध

f

मादी वृक्षांवर फळे

फॅाल सिझन मधील Chinese Pistache

हा वृक्ष त्याच्या फॅालमधील रंगासाठी प्रसिद्ध आहे. हा मध्यम आकाराचा वृक्ष काजू फॅमिलीतील आहे. मुख्यतः शहरात त्याच्या फॅालमधील सौंदर्यासाठी लावतात. मादी वृक्षांवर लाल फळे लागतात ती थंडीच्या मोसमात निळी, जांभळी होतात.

पीन ओकचा वृक्ष

हिरवी, पिवळी, केशरी पाने एकाच वृक्षावर

Pin Oak
जलद वाढणारा , पानगळीचा पीन ओक वृक्ष . बहुदा मध्य व पूर्व ऊत्तर अमेरिकेत दिसतो. पाने पाच ते सहा ठिकाणी विभागलेली ( लोब्ड )असतात. याची वरची पाने वर , खालची पाने खालच्या बाजूला झुकतात व मधली पाने समांतर वाढतात.

Ginkgo Biloba

Ginco Bilbo’s

हा अतिशय पुरातन वृक्ष आहे. याला living fossil म्हणतात. खूप उपयुक्त व अनेक औषधांसाठी याच्या पानांचा अर्काचा वापर होतो. याची पाने पंख्याच्या आकाराची विभागलेली ( lobed )असून वाऱ्यासंगे डुलतात व नाचतात. हे एक कॅानिफर असल्याने याला फुले येत नाहीत. पण फॅालमध्ये यांचा रंग पिवळा व नंतर सुंदर केशरी होईल.

Catalpa flowers.

Southern Catalpa ही सुंदर पांढरी फुले मी न्यूयॉर्कला जून महिन्यांत पाहिली होती.

काल मी याच्या फॅाल सिझनमधील शेंगा पाहिल्या. याची मोठी ह्रदयातकृती पाने असतात. हा पानगळीचा वृक्ष आहे. वसंत ऋतूत अखेर याला गुच्छात बेलच्या आकाराची पांढरेी फुले येतात. नंतर फॅालमध्ये पानांचा रंग बदलून अरुंद लांब शेंगा लोंबकाळू लागतात. ( ती cigar सारखी दिसतात.)

कटाल्पाच्या शेंगा.

मेपल वृक्ष.

Maple Asar Rubrum, गेल्या आठवड्यात माझ्या नातीच्या डे केअर जवळच्या झाडाचे रंग

Acer Rubrum. Maple tree
या आठवड्यात तोच वृक्ष – मेपल

मेपल हा मध्यम आकाराचा किंवा मोठा पानझडीचा वृक्ष आहे. फॅालमध्ये पानगळ चालू झाली की मेपलची पाने सर्व प्रथम रंग बदलू लागतात. ही पाने तीन किंवा पाच ठिकाणी विभागलेली (लोब्ड ) असतात व यांच्याकडा दातेरी असतात. पहिल्यांदा या वृक्षांचे बुंधेही गुळगुळीत व करडे असतात .फॅालमधील याच्या पिवळा, भगवा व भडक लाल रंगासाठी हा वृक्ष प्रसिद्ध आहे. फॅालमधली हे वृक्ष लक्षवेधी दिसतात.

Acer Rubrum

मेपलची पाने Acer Rubrum

London Plane tree.

London plane tree

london plane tree

हा मोठा पानझडीचा वृक्ष आहे. याची मोठी पाने मेपलसारखी असतात याच्या बुंध्याची वरची साल अनियमित आकारात गळून पडते. ( peeling bark ) आतील हिरवट पांढरा बुंधा छान दिसतो. उन्हाळ्यात हिरवी असलेली पाने फॅालमध्ये पिवळी तपकिरी होतात. याला गोल बिया असलेली काटेरी फळे लागतात. शुशोभीकरणासाठी रस्यावर लावतात.

Tulip Poplar .

हा मोठा होणारा पानगळीचा वृक्ष चार ठिकाणी ( लोब्ड् ) विभागलेली असतो, याला ट्युलिप यारखी सुंदर फुले येतात. म्हणून याला ट्युलिप पॅापलर म्हणतात.फॅाल सिझनमध्ये पानांचे रंग बदलतात. सावलीसाठी हा वृक्ष उपयोगी आहे.

Tulip tree Yellow Poplar

Golden Rain Tree flowers

Golden Rain tree चे पिवळे व नारिंगी पॅाडस्

गोल्डन रेन ट्रीच्या बियांचे गुलाबी कंदील.
Golden Rain Tree

अतिशय सुंदर पानझडीचा वृक्ष आहे. वसंतात याला छोट्या पिवळ्या फुलांचे तुरे येतात. नंतर नंतर उन्हाळ्यात बियांच्या पेपर कंदीला सारखी फळे येतात. ती आधी हिरवी, नंतर पिवळी लाल व मग ब्राउन रंगाची होतात. आता पानेही पिवळी पडली आहेत.

Hawthorn berries in fall.

आता संध्याकाळी पाच वाजता काढलेला फोटो. Heritage Park.

हथॅार्नचे अनेक वृक्ष मानसीच्या Heritage Park मध्ये आहेत .. हा एक सदाहरित झुडूपवजा वृक्ष . आहे. याची पाने हिरवीगार, चमकदार व लोब्ड असतात. याची छोटी पाने ओक वृक्षाच्या पाना सारखी दिसतात. वसंत ऋतूत याला छोटी पांढरी व लाल फुले येतात. व फॅाल सिझनमध्ये लाल फळांनी झाड भरते. ( haws) या फुलांतील मध खायला माशा,पक्षी, छोटे प्राणीही येतात. याच्या लाल पांढऱ्या फुलांमुळे व लालचुटुक बेरींमुळे रस्त्यांवर लावतात.

Pyracantha..

Pyracantha .

हे छोटे झुडूप किंवा वृक्ष कंपाऊंडला किंवा पडद्यासारखा उपयोग करण्यासाठी लावतात. फॅालमध्ये त्याला लाल भडक किंवा ॲारेंज रंगाच्या बेरीज् येतात. याची पाने वेगळी आहेत. फळांचे झुपके सुंदर दिसतात.

Pyracantha orange berries.

स्विट गम वृक्ष

American Sweet gum

स्विटगमची स्टारच्या आकाराची पाने व काटेरी गोल फळे. फॅाल सिझनमधये. याची स्टारच्या आकाराची पाने पाच ते सात ठिकाणी विभागलेली असतात. ती मेपल सारखी दिसतात पण एक आड एक येतात. ( alternate )ती फॅालमध्ये पिवळी, केशरी, तांबडी होतात.

Strawberry Tree

गुलाबी फुले

हा एक सदाहरित छोटेखानी वृक्ष आहे. भुमध्यसागरीहवामान व पश्चिम युरोप येथील हा मुळ वृक्ष आहे . त्याच्या सौंदर्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याची फळेही खातात. यांची चकचकीत पाने, बेलच्या आकाराची गुलाबी व पांढरी फुले व स्ट्रॉबेरीसारख्या फळांसाठी हा अनेक ठिकाणी लावतात.

स्ट्रॉबेरी वृक्षाची फळे

Black walnut tree in Fall season.

ब्लॅक वॅालनटची मोठाली पाने

Black walnurs

हा पानगळीचा वृक्ष अमेरिकेच्या उत्तर पूर्व भागात जास्त प्रमाणात आढळतो. हा अतिशय उंच होणारा वृक्ष आहे ७० ते ९० फूट उंच होतो व ३० ते ४० फूट पसरतो. याची संयुक्त पाने असून ती १२ ते २४ इंच ही लांब असतात. यांचे लाकूड ( timber ) मौल्यवान आहे. ब्लॅक वॅालनट पौष्टिक असतात व मोठ्या प्रमाणात मिळतात.